Indian Navy Recruitment: भारतीय नौदल भरतय रिक्त जागा; 6 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज, घ्या जाणून पात्रता, अटी-शर्थींबाबत अधिक माहिती
भारतीय नौदल (Indian Navy) आपल्या रिक्त जागा भरत आहे. त्यासाठी लवकरच एक भरतीही (Indian Navy Vacancy) आयोजितकरण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार नौदलाच्या एकूण 112 जागांसाठी ही भरती असेल.
भारतीय नौदलात नोकरी (Indian Navy Recruitment) करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणाईसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदल (Indian Navy) आपल्या रिक्त जागा भरत आहे. त्यासाठी लवकरच एक भरतीही (Indian Navy Vacancy) आयोजितकरण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार नौदलाच्या एकूण 112 जागांसाठी ही भरती असेल. त्यासाठी नौदलाने भरती प्रक्रिया जारी केली आहे. आपणही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर त्यासाठी अर्जाची मुदत, अर्ज करण्याची पद्ध, वय, पात्रता आणि अटी व शर्थी यांबाबत अधिक तपशील जाणून घेऊ शकता. त्यासाठी खाली दिलेली माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
कसा कराल अर्ज?
भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला अर्ज दाखल करता येऊ शकेल. त्यासाठी joinindiannavy.gov.in. हे संकेतस्थळ वापरा.
पद- ट्रेड्समन
अर्जाची मुदत
ट्रेड्समन मेट पदासाठी ही भरती असून त्यासाठी 06 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत आहे. ही अर्ज प्रक्रिया ठी 06 सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण केली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 06 सप्टेंबर 2022 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पाठवावेत. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) जाऊन रिक्त जागांची (Vacant Post) संपूर्ण माहिती मिळवू शकता. (हेही वाचा, Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी, रेल्वे भरती बोर्डाकडून RRB GROUP D परिक्षेची तारीख जाहीर)
परीक्षेची तारीख
परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. मात्र, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी पार पाडाल?
आपणास आगोदर भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. इथे पेजवरील नवीनतम रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा आपल्याला 'इंडियन नेव्ही एचक्यू ए अँड एन ट्रेड्समन मेट ऑनलाइन फॉर्म 2022 ' दिसेल. त्यावर क्लिक करा. नाही दिसला तर थोडे शोधण्याचे कष्ट घ्या. अर्ज उघडल्यावर त्यातील आवश्यक तपशील बिनचूक भरा. आपला अर्ज तिथून आपल्याला पाठवता येऊ शकेल.
पात्रता आणि वय
उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक आणि 25 वर्षांपेक्षा कमी असावे. त्याच्याकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय बंधनकारक. 06 सप्टेंबर 2022 च्या आधारे वय गृहित धरले जाईल अथवा ठरवले जाईल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या अर्जानुसार गुणवत्तेच्या आधारे परीक्षेसाठी निवडले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन बेस्ड लेखी द्यावी लागेल. परीक्षेसाठी 100 गुणांची प्रश्नपत्रीका असेल. ती इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल. उमेदवारांना परीक्षेबाबतची महत्त्वाची माहिती जसे की, नेमकी तारीख, वेळ आणि ठिकाण याची माहिती मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर दिली जाईल. ख्यालय अंदमान निकोबार कमांडसाठी ही भरती असेल.