IBPS SO Recruitment 2021: 1828 जागांसाठी नोकरभरती; ibps.in वर 23 नोव्हेंबर पर्यंत करा अर्ज
IBPS SO Exam 2021 करण्यासाठी आता 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे
IBPS कडून स्पेशलिस्ट ऑफिसर भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. IBPS SO Exam 2021 करण्यासाठी आता 3 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. इच्छुक उमेदवार ibps.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात. नुकत्याच जारी झालेल्या नोटीफिकेशननुसार, 1828 जागांवर नोकरभरती होणार आहे. या करिता प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू राऊंड होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन करताना शुल्क बहरवे लागणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि पीड्ब्युडी साठी 175 रूपये शुल्क असणार आहे तर अन्य वर्गातील उमेदवारांना 850 रूपये शुल्क भरावा लागणार आहे. इथे पहा नोटिफिकेशन .
IBPS SO Recruitment 2021 च्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अॅप्लिकेशन सुरू - 3 नोव्हेंबर
ऑनलाईन अॅप्लिकेशन अंतिम तारीख - 23 नोव्हेंबर
फी जमा करण्याची अंतिम तारीख - 23 नोव्हेंबर
प्रिलिम्स कॉल लेटर कधी - डिसेंबर 2021
ऑनलाईन प्रिलिम्स परीक्षा - 26 डिसेंबर 2021
प्रिलिम्स निकाल - जानेवारी 2022
ऑनलाईन मुख्य परीक्षा हॉल तिकीट - जानेवारी 2022
ऑनलाईन मुख्य परीक्षा - 30 जानेवारी 2022
ऑनलाईन मुख्य परीक्षा निकाल - फेब्रुवारी 2022
मुलाखत फेरी - फेब्रुवारी / मार्च 2022
अंतिम भरती - एप्रिल 2022
नक्की वाचा: Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे मध्ये नोकरीची संधी; 21 नोव्हेंबर पर्यंत rrc-wr.com वर करा ऑनलाईन अर्ज.
बॅंकेमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना ही नोकरभरती ही एक उत्तम संधी आहे. या नोकरभरती मधून 1800 विविध पदांवर नोकरभरती केली जाणार आहे. यामध्ये आय टी ऑफिसर च्या 220 जागा, कृषी क्षेत्र अधिकार्याच्या 884 जागा, राजभाषा अधिकार्याच्या 84 जागा, विधि अधिकार्याच्या 44 जागा, एचआर च्या 61 जागा, मार्केटिंग ऑफिसरच्या 535 जागा भरल्या जाणार आहेत.