Freshers Jobs: आयटी क्षेत्रात फ्रेशर्सना मोठी संधी; TCS, Infosys, Wipro, HCL देणार एक लाखांहून अधिकांना नोकरी
अशा स्थितीत देशातील आयटी कंपन्या (IT Companies) मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावर घेत आहेत. त्यापैकी, जास्तीत जास्त फ्रेशर्सना संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत
कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी दरम्यान डिजिटल प्रतिभेची मागणी लक्षणीय वाढली आहे. अशा स्थितीत देशातील आयटी कंपन्या (IT Companies) मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावर घेत आहेत. त्यापैकी, जास्तीत जास्त फ्रेशर्सना संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात (2021-22), देशातील चार सर्वात मोठ्या आयटी कंपन्या-टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजी (TCS, Infosys, Wipro, HCL) एक लाखांहून अधिक फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहेत. तिमाही निकालांच्या घोषणेसह चार कंपन्यांनी ही गोष्ट सांगितली. त्यामुळे जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ने म्हटले आहे की, कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 35 हजार फ्रेशर्सची नियुक्ती करेल. या नियुक्तीनंतर, चालू आर्थिक वर्षात त्यांची एकूण नियुक्ती 78 हजारांवर पोहोचेल. गेल्या सहा महिन्यांत कंपनीने 43 हजार पदवीधरांची नेमणूक केली आहे. सप्टेंबर तिमाहीत टीसीएसचा एट्रिशन दर जून तिमाहीत 8.6 टक्क्यांवरून वाढून 11.9 टक्के झाला आहे. कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की, वाढत्या अॅट्रिशन रेटबद्दल कंपनी चिंताग्रस्त आहे.
इन्फोसिस भरतीबद्दल बोलताना, कंपनीने सांगितले की चालू आर्थिक वर्षात 45,000 महाविद्यालयीन फ्रेशर्सची नियुक्ती केली जाईल. यापूर्वी कंपनीने 35 हजार फ्रेशर्स घेण्याची योजना बनवली होती. कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रवीण राव म्हणाले की, वाढत्या अट्रिशनचे प्रमाण लक्षात घेऊन कंपनीने फ्रेशर्सची नियुक्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 606 पदांसाठी भरती, 'असा' करता येईल अर्ज)
विप्रोबद्दल बोलताना, सप्टेंबर तिमाहीच्या निकालाच्या घोषणेसह, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी थियरी डेलापोर्टे म्हणाल्या की, सप्टेंबर तिमाहीत कंपनीने महाविद्यालयातून 8100 पदवीधरांना नियुक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, कंपनीने पुढील आर्थिक वर्षात 25,000 महाविद्यालयीन फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे.
एचसीएल टेक्नॉलॉजीबद्दल बोलताना, कंपनीने म्हटले आहे की ती चालू आर्थिक वर्षात 20-22 हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देईल. कंपनी पुढील आर्थिक वर्षापर्यंत 30,000 फ्रेशर्सना टीममध्ये समाविष्ट करण्याची तयारी करत आहे.