Eastern Coal Limited Recruitment 2021: ईस्टर्न कोल लिमिटेड मध्ये सीनियर मेडिकल ऑफिसरसह 75 पदांवर नोकर भरती, 30 एप्रिल पर्यंत करता येणार अर्ज
त्यानुसार सीनियर मेडिकल स्पेशलिस्ट, मेडिकल स्पेशलिस्ट E3, सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटलच्या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Eastern Coal Limited Recruitment 2021: ईस्टर्न कोल लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार सीनियर मेडिकल स्पेशलिस्ट, मेडिकल स्पेशलिस्ट E3, सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटलच्या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 38 पदांसाठी नोकरी भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या आणि योग्य उमेदवारांनी अधिकृत www.easterncoal.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ईस्टर्न कोल लिमिटेड कडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार सीनियर मेडिकल स्पेशलिस्ट ई4, मेडिकल स्पेशलिस्टच्या 22 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तर सीनियर मेडिकल ऑफिसर 51 आणि सिनियर मेडिकल ऑफिसर डेंटल ई3 च्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
ECL नुसार सीनियर मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएसची डिग्री घेतलेली असावी. त्याचसोबत उमेदवाराला 3 वर्षांचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटल ई3 च्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सुद्धा मान्यताप्राप्त संस्थेतून बीडीएसची डिग्री घेतलेली असावी. या व्यतिरिक्त उमेदवारांना एका वर्षाचा अनुभव असावा. उमेदवारांना लक्षात असू द्या की, नोटिफिकेशन योग्य पद्धतीने वाचल्यानंतर अर्ज करावा. नाहीतर अर्ज रद्द केला जाणार आहे.(ISRO Recruitment 2021: इस्रो मध्ये अकाउंट्स आणि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज)
सीनियर मेडिकल ऑफिसर- 70,000- 20,000 दरम्यान वेतन असू शकते.
सीनियर मेडिकल ऑफिसर, सीनियर मेडिकल ऑफिसर डेंटल- 60,000-1,80,000 दरम्यान वेतन असू शकते.
या व्यतिरिक्त पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार इलेक्ट्रिशन, फिटर, वेल्टर, पेंटर, कारपेंटर, प्लम्बंर, ब्लॅकस्मिथ, वायरमॅनसह अन्य पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 716 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना wcr.indianrailway.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2021 आहे.