कर्मचारी निवड आयोगाच्या परिक्षांच्या नव्या तारखा 3 मे नंतर ठरणार, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मोठा निर्णय

याच पार्श्वभुमीवर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचारी निवड आयोगाच्या परिक्षांच्या नव्या तारखा 3 मे नंतर ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तसेच कोरोनाबाधितांचा आकडा सुद्धा वाढत आहे. यामुळे सरकारने येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र कोरोनाची एकूणच देशातील परिस्थिती पाहता शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यासोबत त्यांच्या परिक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचारी निवड आयोगाच्या परिक्षांच्या (Staff Selection Exam) नव्या तारखा 3 मे नंतर ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाउनच्या काळात विविध गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या नियोजित करण्यात आलेल्या परिक्षा आता रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून कर्मचारी निवड आयोगाच्या परिक्षांच्या तारखांचा वेळोवळी आढावा घेण्यात येणार आहे. तर संयुक्त उच्च माध्यमिक (10 + 2) परीक्षा (श्रेणी – 1), कनिष्ठ अभियंता (पेपर – 1) परीक्षा 2019, स्टेनोग्राफर श्रेणी 'सी` आणि `डी` परीक्षा 2019 आणि संयुक्त उच्च माध्यमिक श्रेणी परीक्षेसाठी कौशल्य चाचणी परीक्षा 2018 या परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय 3 मे, 2020 नंतर म्हणजेच लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर घेतला जाणार आहे.(Coronavirus: भारतातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या 12,759 वर, तर 53 देशातील 3036 भारतीयांना लागण)

स्टाफ सिलेक्शनच्या परिक्षांचे केलेले नियोजन आयोगाच्या संकेतस्थळावर आणि आयोगाच्या प्रादेशिक/उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिसुचित केले जाणार आहे. आयोगाने अधिसूचित केलेल्या परिक्षांच्या वार्षिक वेळापत्रकासोबत अन्य परिक्षांच्या वेळापत्रकाचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे. तसेच स्टाफ सिलेक्शन कमीशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचऱ्यांची त्यांचा एक दिवसाचा पगार आपत्कालीन परिस्थितीतील पंतप्रधान नागरिक सहायता आणि मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.