10 वी-12 वीच्या परिक्षा प्रश्नपत्रिकेत CBCE बोर्डाकडून करण्यात येणार बदल

वेळेची गरज पाहता हा बोर्डाकडून हे पाऊल उचचले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हीटी आणि विश्लेषणची क्षमता वाढवण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) यांनी 2013 पर्यंत 10वी आणि 12वीच्या परिक्षा प्रश्नपत्रिकेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वेळेची गरज पाहता हा बोर्डाकडून हे पाऊल उचचले आहे. भारतीय वाणिज्य अॅन्ड उद्योग मंडळ यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या शिक्षा शिखर सम्मेलनात सीबीएससीचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी असे म्हटले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर 10 वी आणि 12 वीच्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना 10 टक्के ऑब्जेटिक्टिव्ह प्रश्न सोडवायचे आहेत. तर 10 टक्के प्रश्न क्रिएटिव्ह आयडियाच बाबत विचारले जाणार आहे. 2023 पर्यंत 10 वी आणि 12 वी प्रश्नपत्रिकेत रचनात्मक, विश्लेषण यावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्रिपाठी यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, भारतात व्यावसायिक विषयांसाठी बहुतांश विद्यार्थी सहभागी होत नाहीत. यामुळे रोजगाराची कमतरता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण न मिळाल्याने काही समस्या उद्भवल्या जातात. सीबीएसीच्या सचिवांच्या मते, शिक्षणाच्याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये नातेसंबंध खेळीमेळीचे असणे महत्वाचे आहे.(Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर)

तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना अभ्यासाचे आयोजन करता यावा, यासाठी काही दिवस आधीच बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा 3 मार्च रोजी सुरु होणार असून 23 मार्च रोजी त्यांच्या शेवटचा पेपर असणार आहे. तसेच बारावीच्या परीक्षेला 18 फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर मंडळाच्या mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत एकाचवेळी बारावी आणि दहावीची लेखी परीक्षा होणार आहे.