CBSE Board Exams 2024 Advisory: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! उद्यापासून सुरु होत आहेत सीबीएसई बोर्डाच्या 10वी-12वीच्या परीक्षा; मंडळाने जारी केल्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना, घ्या जाणून

यावर्षी भारत आणि परदेशातील 26 देशांतील 39 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दिल्लीतील 877 परीक्षा केंद्रांवरून 5,80,192 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसतील.

Students writing an exam, File photo

CBSE Board Exams 2024 Advisory: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education) इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहेत. सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षा 2024 साठी देशात सुमारे 35 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परदेशात सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा असल्याने तेथेही ही परीक्षा घेतली जाते. अशात आता सीबीएसई बोर्डाने उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यांचे पालन करणे अनिवार्य आहे.

तुम्ही अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर सीबीएसई बोर्ड परीक्षा 2024 ची डेटशीट तपासू शकता. सीबीएसई बोर्डाने याआधीच विद्यार्थ्यांसाठी बनावट सोशल मीडिया अकाउंटची यादी जाहीर केली आहे.

यासोबतच बोर्डाच्या परीक्षेशी संबंधित अफवा, पेपरफुटी आणि फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी नोटीसही जारी करण्यात आली आहे.

तुम्ही सीबीएसई बोर्ड परीक्षा 2024 देणार असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

यंदा 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून म्हणजेच 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. यावर्षी भारत आणि परदेशातील 26 देशांतील 39 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दिल्लीतील 877 परीक्षा केंद्रांवरून 5,80,192 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसतील.

परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होत असल्याने, सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 10.00 वाजता किंवा त्यापूर्वी त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीमुळे, ट्रॅफिकशी संबंधित समस्या असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे सीबीएसईने जारी केलेल्या सूचनांनुसार वेळेवर पोहोचण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना लवकर घर सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रो सेवा वापरण्याचा सल्ला दिला जातो.

संपूर्ण भारत आणि इतर देशांतील सर्व सीबीएसई विद्यार्थ्यांना स्थानिक परिस्थिती, रहदारी, हवामान परिस्थिती, अंतर इत्यादी लक्षात घेऊन सकाळी 10.00 वाजता (IST) परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची विनंती केली जाते.

सकाळी 10 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परवानगी दिली जाणार नाही.

सर्व शाळांना विनंती आहे की, त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी त्यांच्या परीक्षा केंद्राला अगोदरच भेट द्यावी आणि त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे जेणेकरून ते परीक्षेच्या सर्व दिवसांमध्ये वेळेवर पोहोचू शकतील. (हेही वाचा: CBSE Fake 'X' Handles: सीबीएसईने बोर्ड परीक्षेपूर्वी जाहीर केली 30 बनावट 'X' हँडलची नावे; फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन, पहा संपूर्ण यादी)

परीक्षा कक्षात सामानाची देवाणघेवाण करण्याची परवानगी नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची स्टेशनरी सोबत आणणे गरजेचे आहे. परीक्षा हॉलमध्ये कोणतेही अनधिकृत साहित्य नेण्यास परवानगी नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif