सीमा सुरक्षा दलात 2700 हून अधिक कॉन्स्टेबल पदासाठी नोकर भरती, 10 वी पास उमेदवारांना करता येईल अर्ज
सीमा सुरक्षा बलात नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण या नोकर भरती अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या पदावर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तर अर्ज प्रक्रिया 16 जानेवारी पासून सुरु झाली आहे. त्यमुळे इच्छुक उमेदवारांना rectt.bsf.gov.in येथे उपलब्ध असलेल्या ऑनलाईन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त 8-14 जानेवारी मध्ये जाहीर करण्यात आलेल्या बीएसएफच्या कॉन्स्टेबल पदाच्या भरतीनुसार विविध ट्रेडमध्ये एकूण 2788 पदांवर उमेदवार भरले जाणार आहेत.(HC Recruitment 2022: बाॅम्बे हायकोर्टात नोकरीच संधी, 27 जानेवारी पर्यंत करता येईल अर्ज)
अर्जासाठी प्रथम उमेदवारांना बीएसएफच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. अर्जसाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.BSF कॉन्स्टेबल भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार rectt.bsf.gov.in या अधिकृत भरती पोर्टलवर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. तथापि, उमेदवार खाली नमूद केलेल्या थेट लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड करू शकतात आणि थेट अर्जाच्या पेजवर जाऊ शकतात.(Jobs in IT: आयटी क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी; यावर्षी Infosys देणार तब्बल 55,000 जणांना नोकऱ्या)
बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी भर्ती 2021 अधिसुचनेनुसार, अर्जानुसार इच्छुक उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डात 10 वी च्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले असावे. त्याचसोबत उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आणि 23 वर्षापेक्षा अधिक नसावे. दरम्यान, आरक्षित वर्गासाठी उमेदवारांना वयात सूट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.