Army Public School Recruitment: शिक्षकांना नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या पात्रता आणि महत्वाच्या तारखा

या जागांसाठी सध्या नोकरभरती सुरु झाली आहे. आपल्याला जर शिक्षक म्हणून काम करायचे असे आणि आपण नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही खूप चांगली संधी आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Youtube)

आर्मी पब्लिक स्कूल (APS) येथे तब्बल 8000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागांसाठी सध्या नोकरभरती सुरु झाली आहे. आपल्याला जर शिक्षक म्हणून काम करायचे असे आणि आपण नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही खूप चांगली संधी आहे. उमेदवार या पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, त्यासाठी तुम्हाला  aps-csb.in orwww.awesindia.com या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झाली आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2019 आहे. म्हणजे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे अजून 11 दिवसांचा कालावधी आहे.

महत्वाच्या तारखा - 

4 ऑक्टोबरपासून उमेदवार प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतील. निवड प्रक्रिया 19 आणि 20 ऑक्टोबररोजी घेण्यात येणा स्क्रीनिंग टेस्टच्या आधारे पार पडणार आहे. याचा निकाल 30 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जे उमेदवार स्टेज 1 स्क्रीनिंग चाचणी पूर्ण करतील, त्यांची पुढे शिकवण्याच्या कौशल्यांचे मूल्यांकन आणि संगणक प्रवीणता यांच्या आधारे मुलाखत घेतली जाईल.

पात्रताः

पीजीटीसाठी अर्जदाराकडे पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. सोबत त्याला बी एडमध्ये कमीत कमी 50% गुण मिळाले असावेत.

टीजीटीसाठी अर्जदाराकडे पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे आणि बी एडमध्ये कमीत कमी 50% असणे आवश्यक आहे. (हेही वाचा: RRB JE CBT 2 Exam 2019: आरआरबी जेई भरती सीबीटी-2 परीक्षेची तारीख बदलली, आज जाहीर होणार परीक्षा शहर व इतर माहिती)

पीआरटीसाठी अर्जदाराने पदवीधर असणे आवश्यक आहे आणि बी एड किंवा 2 वर्षांच्या डिप्लोमा कोर्समध्ये 50% गुण प्राप्त केले असावेत.

उमेदवार 4 ते 13 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन मॉक टेस्ट घेऊ शकतील. इथे तुम्ही अधिकृत सूचना पाहू शकाल. 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif