हॅक झालेली Amity University ची वेबसाईट पूर्ववत; मात्र हॅकर्सचा शोध अद्याप सुरु

दोन दिवसांपूर्वी अॅमेटी युनिव्हर्सिटीची हॅक झालेली ऑफिशिअल वेबसाईट amity.edu रिस्टोर करण्यात आली आहे.

Amity University (Photo Credits: Screengrab/amity.edu)

दोन दिवसांपूर्वी अॅमेटी युनिव्हर्सिटीची (Amity University) हॅक झालेली ऑफिशिअल वेबसाईट amity.edu रिस्टोर करण्यात आली आहे. वेबसाईट हॅक झाल्यानंतर साईटच्या प्लेसमेंट सेक्शनमध्ये विचित्र मेसेजेस दिसत होते. कोणीतरी वाईट हेतूने हे कार्य केल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. अद्याप हॅकर्सचा शोध लागलेला नसून याबद्दलचा अधिक तपास सुरु आहे. (Amity University ची वेबसाईट हॅक! Pornhub.com, Xvideos.com आणि Porn.com येथे जॉब मिळवण्यासाठी 3 लाखांची मागणी)

अॅमेटी युनिव्हर्सिटीत प्रवेश प्रक्रीया सुरु असताना साईट हॅक करण्यात आली. त्यानंतर प्लेसमेंट सेक्शमध्ये पार्न साईटवर काम करण्यासाठी 5000 डॉलर्स म्हणजेच 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या विचित्र, अश्लिल मेसेजेसमुळे विद्यार्थ्यांना काही काळापुरते वेबसाईटला भेट न देण्याचा सल्ला देण्यात आला होता. (SBI ग्राहकांना धक्का; बँक बॅलन्ससह इतर महत्त्वाची माहिती लीक झाल्याची शक्यता)

त्याचबरोबर "प्लेसमेंट नाही. एफ ** ऑफ आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्लेसमेंट देणार नाही, तुम्ही विद्यार्थी निरुपयोगी आहात. तुम्हाला काय वाटत? हे आमचे काम आहे?" असा मेसेजही साईटवर दिसत होता. पण आता साईट पूर्ववत करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. मात्र अद्याप हॅकर्सचा तपास लागलेला नाही. (Pune Cosmos Bank Cyber Attack: 94 कोटी लंपास करण्यामागे 'उत्तर कोरिया' च्या हॅकर्सचा हात; संयुक्त राष्ट्राचा अहवाल)

सध्याच्या डिजिटल युगात वेबसाईट हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी देखील बँका, राजकीय पक्ष, देशाच्या अधिकृत तर कधी सेलिब्रेटींचे पर्सनल अकाऊंट्स हॅक झाल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif