Pooja Singhal Property Attached: झारखंडच्या निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघलवर ED ची कारवाई; हॉस्पिटलसह कोट्यवधींची मालमत्ता जप्त

या मालमत्तांमध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 1 डायग्नोस्टिक सेंटर आणि दोन जमीन पार्सल यांचा समावेश आहे.

Suspended IAS Pooja Singhal (PC - Twitter)

Pooja Singhal Property Attached: मनरेगा घोटाळ्याप्रकरणी (MGNREGA Scam) तुरुंगात असलेल्या निलंबित IAS पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने रांचीमधील पूजा सिंघलची 82.77 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता कायमची जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 1 डायग्नोस्टिक सेंटर आणि दोन जमीन पार्सल यांचा समावेश आहे. संलग्न मालमत्तेमध्ये, एक पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दुसरे पल्स डायग्नोस्टिक आणि इमेजिंग सेंटर आहे. याशिवाय सिंघल यांचे पती, त्यांचे अकाउंटंट आणि चार कनिष्ठ अभियंतेही ईडीच्या रडारवर आहेत.

दरम्यान, 18.06 कोटी रुपयांचा मनरेगा घोटाळा पुजा सिंघल या खुंटी जिल्ह्यातील उपायुक्त असतानाच्या काळातील आहे. विविध विकास प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यासाठी त्या नोडल ऑफिसर होत्या. 5 मे रोजी ईडीने पूजा सिंघलच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. (हेही वाचा -

मनरेगा योजनेचे पैसे कोणतेही काम न करताच काढून घेतल्याचा आरोप पूजावर आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर राज्य सरकारने पूजा सिंघलला क्लीन चिट दिली होती. पूजा सिंघलला क्लीन चिट देण्यात आली तेव्हा झारखंडमध्ये रघुवर दास यांचे सरकार होते.

तथापी, ईडीला तपासादरम्यान पूजा सिंघलकडे बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. मनरेगा घोटाळ्याप्रकरणी ईडीने 6 मे रोजी पूजा सिंघल आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या जवळपास 25 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणी पूजाला 11 मे रोजी अटक करण्यात आली होती, त्यानंतर तिला 25 मे रोजी तुरुंगात पाठवण्यात आले होते. तसेच 27 सप्टेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे RIMS मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, 27 नोव्हेंबर रोजी त्यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली.