Delhi Gang Rape Case: 12 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपी अल्पवयीन; महिलेसह चार जणांना अटक

दिल्लीत दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान, दिल्ली एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Delhi Gang Rape Case:  दिल्लीत दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान,  दिल्ली एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या घटनेअंतर्गत दिल्ली पोलिसांनी एक पुरुष, एका महिलेसोबत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आले आहे. एका महिलेने पीडित मुलीला आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेल आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना 1 जानेवारी रोजी घडली होती. (हेही वाचा- नवी मुंबईत 12 वर्षाच्या मुलीशी लग्न करून बलात्कार, गरोदरपणामुळे बिंग फुटलं)

मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी आरोपी महिलेने पीडित मुलीला आमिष दाखवून जवळ बोलावून घेतले. तीला पैशांचे आमिष दाखवून, तीला दुर्गम ठिकाणी नेलं आणि चार जणांनी तिच्यावर आमानुषपणे सामुहिक बलात्कार केला. बलात्कार करणाऱ्यापैकी तिघे आरोपी  हे अल्पवयीन असल्याचे समोर आले. पीडित मुलगी ही बवाना येथील रहिवासी आहे. बवाना येथे ती कचरा उचलण्याचे काम करते. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. पीडित मुलीवर बलात्कार करून तिच्यावर तीला धमकी दिली. ही गोष्टी कोणाला सांगल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी मुलीने ही गोष्ट तिच्या चुलत भावाला सांगितली, त्यानंतर त्याने ही सर्व हकिकत आईवडिलांना सांगितल्या.त्यांनी ही गोष्टी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या घटनेची तपासणी करत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एक पथक तयार केले. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि महिलेवर आमिष दाखवण्याचा गुन्हा दाखल केला.