देहराडून येथील वसतिगृहात मुलाची हत्या, घरातील मंडळींना न सांगताच पुरला मृतदेह
देहराडून (Dehradun) येथे 12 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्यानंतर शाळेच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्याचा मृतदेह घरातील मंडळींना न सांगतात पुरला असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
देहराडून (Dehradun) येथे 12 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्यानंतर शाळेच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्याचा मृतदेह घरातील मंडळींना न सांगतात मातीत पुरला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. वसतिगृहाच्या 12 वर्षीय मुलाची दोन सिनिअर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्यावरुन भांडण झाले होते. त्यावरुन सिनिअर विद्यार्थ्यांनी पीडित मुलाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. परंतु शाळेच्या प्रशासनाने या प्रकरणी कोणाला थांगपत्ता लागू नये म्हणून मुलाचा मृतदेह परस्पर शाळेच्या परिसरात पुरला.
शाळेच्या प्रशासनाने या घटनेचा खुलासा होऊ नये म्हणून विविध अडथळे निर्माण केले. तर विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलेल्या सिनिअर्सकडून त्याचा मृतदेह वसतिगृहात हत्या केल्यानंतर तसाच टाकून पळाले होते. त्यानंतर शाळेच्या प्रशासनाने या घटनेचा खुलासा न होण्यासाठी पोलिसांकडे गुन्हासुद्धा दाखल केला नाही. परंतु वसतिगृहाच्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार पाहिला होता.(हेही वाचा-बलात्कार केल्यानंतर पीडित तरुणीला लग्न कर किंवा वेशाव्यसाय करण्यासाठी आरोपीकडून गळ)
टीओआयने (TOI) दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी शाळेच्या प्रशासनाला दोषी ठरवण्यात आले असून खेळाचे शिक्षक, वसतिगृहाचे मॅनेजर आणि वार्डन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हत्या करण्यात आलेल्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सुद्धा वसतिगृहाने पाठवला नसल्याचे ही सांगण्यात येत आहे.