Cylinder Blast in Madhya Pradesh: छत्तरपूरमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; ‘चाट’ स्टॉलवर झालेल्या घटनेत 40 जण जखमी (Watch Video)

आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत 40 जण जखमी झआले आहेत.

Fire प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

MP Gas Cylinder Blast: मध्य प्रदेशमधील छतरपूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छतरपूरमधील विजवार बसस्थानकाजवळ असलेल्या चाट स्टॉलवर (Chaat Stall) हा स्फोट झाल्याची माहिती आहे.सर्व जखमींना उपचारासाठी छतरपूर येथील रुग्णावयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 40 जण जखमी झाल्याची शक्यता आहे. छतरपूरच्या बिजावर बसस्थानकाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सिलिंडर स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. छतरपूरमध्ये रविवारचा बाजार असल्याने बसस्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी होती. एक जण व्यक्ती बसस्थानकावर पणत्या विकत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तेथए असलेल्या चाट स्टॉलवरील गॅस सिलेंडरमधून गळती होऊ लागली. (हेही वाचा: Manipur Violence: अमित शाह यांनी मणिपूरमधील परिस्थितीचा घेतला आढावा; शांतता सुनिश्चित करण्यासाठी संभाव्य पावले उचलण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश)

हा वायू आजूबाजूला पसरला, त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली. जखमींमध्ये डझनहून अधिक मुलांचा समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याआधी जूनमध्ये मध्य प्रदेशातील धारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. पिथमपूर औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर 1 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छात्रछाया कॉलनीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली.

40 जण जखमी

काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. यानंतर एकामागून एक घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. 6 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. मात्र, सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती.