Madhya Pradesh: मध्य प्रदेश येथे पंखा चोरणाऱ्याला तब्बल 23 वर्षानंतर झाली शिक्षा
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूर (Indore) येथे पंखा चोरी प्रकरणात दोषी आढळलेल्या एका व्यक्तीला तब्बल 23 वर्षानंतर शिक्षा झाली आहे.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूर (Indore) येथे पंखा चोरी प्रकरणात दोषी आढळलेल्या एका व्यक्तीला तब्बल 23 वर्षानंतर शिक्षा झाली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने (District Court) आरोपीला एक वर्षाची शिक्षा आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने 23 वर्षापूर्वी दोन पंख्याची चोरी केली होती. दरम्यान, आरोपीला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली होती. परंतु, जामिनावर सुटका होताच तो फरार झाला. त्याचा शोध लागेपर्यंत हे प्रकरण प्रलंबित राहिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नावाच्या व्यक्तीने 23 मार्च 1998 मध्ये एका दुकानातील दोन पंख्याची चोरी केली होती. शंकर पळून जाण्याच्या तयारीत असतना दुकानाच्या पहारेदाराने त्याला रंगेहाथ पडकले होते. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. या प्रकरणात अटकेनंतर काही दिवसांनी शंकरला जामीन मिळाला. जामीन मिळताच शंकर फरार झाला. पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही. अनेक वर्ष तो पोलिसांसाठी फरार होता.अखेर बऱ्याच वर्षांनी त्याला अटक झाली. हे देखील वाचा- Republic Day Tractor Rally: किसान ट्रॅक्टर रॅलीनंतर 100 हून अधिक लोक बेपत्ता झाल्याचा दावा; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी जारी केला हेल्पलाईन क्रमांक
शंकरला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध सुरु असलेला हा खटला पुन्हा सुरु झाला. सध्या शंकरचे वय 55 इतके असून त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भूपेंद्र आर्य यांनी शिक्षा सुनावली आहे. त्याला 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्याला एक हजार रुपयांचा दंडही न्यायायलायानं सुनावला आहे.