Video: भररस्त्यात चालत्या बाईकवर कपल रोमान्स, व्हिडिओवर नेटकरी संतापले (Watch Video)
असाच एक दिल्लीतील व्हिडिओ सोशल मीडियावर सद्या तुफान व्हायरल होत आहे.
Video: चालत्या बाईकवर भररस्त्यात रोमान्स करणं हे काही आता सामान्य राहिलं नाही, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक दिल्लीतील व्हिडिओ सोशल मीडियावर सद्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक जोडपे चालत्या बाईकवर अश्लिल कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील विकासपूरी फ्लायओव्हरवर असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. (हेही वाचा- रील बनवण्यासाठी तरुणाने दुचाकीने ओढली ट्रेन; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक, Watch Video
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिला बाईकच्या इंधन टाकीवर बसून प्रियकरला चिटकून बसलेली आहे. दुचाकी भरधाव वेगात धावत आहे. दोघेही एकमेंकांचे चुंबन घेत आहे. रस्त्यावरील दुसऱ्या वाहनातील एका प्रवासाने हे कृत्य रेकॉर्ड केले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या घटनेच्या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्याने या जोडप्याच्या वागणुकीचा निषेध केला आहे. पोस्ट करणाऱ्या युजर्सने या व्हिडिओवर अधिकाऱ्यांना टॅग केले आहे.
रस्त्यात कपल रोमान्स
नेटकऱ्यांनी या जोडप्यांना चांगलेच फटकारले आहे. एकाने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, या लोकांना ना कायद्याचा धाक आहे ना त्यांच्या जीवाची किंमत; तर दुसऱ्या नेटकऱ्यांनी हा रोमॅटिंग स्टंग करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.