Coronavirus: कोरोना व्हायरस बाधित गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बद्रुद्दीन शेख यांचे निधन

काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून पुष्टी केली.

बद्रुद्दीन शेख (Photo Credit: Facebook)

गुजरात कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते बद्रुद्दीन शेख (Badruddin Shaikh) यांचे कोविड-19 (COVID-19) संसर्गामुळे निधन झाले. ते अहमदाबाद महानगरपालिकेत माजी विरोधी पक्षनेते होते. अहमदाबाद मिररच्या रेसिडेन्ट एडिटरने दिलेल्या वृत्तानुसार, आजच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने गुजरात कॉंग्रेसला खूप धक्का बसला आहे. कोरोना व्हायरसची पॉझिटिव्ह चाचणी घेतल्यानंतर शेख यांची तब्येत ढासळली होती ज्या नंतर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.  काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल (Shaktisinh Gohil) यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून पुष्टी केली. कॉंग्रेस नेत्याच्या निधनानंतर त्यांनी शोक संदेश पोस्ट केला. कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्यानंतर कॉंग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Coronavirus in India: भारतात कोरोनाचा कहर सुरूच, संक्रमित लोकांची संख्या 26 हजार पार; गेल्या 24 तासात 1975 नवीन रुग्ण, 47 मृत्यूची नोंद)

गोहिल यांनी लिहिले, “माझ्याकडे शब्द नाही आहे. बद्रुभाई, आम्ही त्यांना म्हणायचो ते शक्ती आणि संयम होते. आमच्या गुजरात कुटुंबातील एक ज्येष्ठ नेते, मी त्यांना 40 वर्षांपासून ते युवा कॉंग्रेसमध्ये होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. ते कठोरपणे गरीब लोकांबरोबर काम करीत होते आणि त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली." मिळालेल्या माहितीनुसार, आमदार इमरान खेडावाला मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भेटण्यासाठी आले असता, शेख देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये जमालपूर-खादी कॉंग्रेसचे आमदार खेडावाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. रुपानी आणि इतरांमध्ये अद्याप कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाही.

गोहिल यांचे ट्विट 

शेख हे शहरातील बेहरामपुरा प्रभागातील नगरसेवक होते आणि त्यांनी गेल्या आठवड्यात महानगरपालिकेत संपर्क साधला होता जिथे त्यांच्या संसर्गाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यांना घरी क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गुजरातमध्ये (Gujarat) गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या नवीन 230 रुग्णांची तर, 18 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 178 लोकं अहमदाबादमधील असून शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2, 181 वर पोचली आहे.