आता मोबाईलवरही मिळवता येणार कोरोनाबाबत संपूर्ण माहिती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हॉट्सऍप क्रमांकाची घोषणा

संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना व्हायरस चीनमधून सर्वत्र पसरला आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार केला जात असल्याचे उघड झाले आहे.

Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) थैमान जगभरात धुडगूस घालत आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना व्हायरस चीनमधून सर्वत्र पसरला आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार केला जात असल्याचे उघड झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अधिक भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाची व्हॉट्सऍप क्रमाकांची (WhatsApp Helpdesk Number) घोषणा केली आहे. या क्रमांकावर नागरिकांना कोरोनाबाबत संपूर्ण माहिती मिळवता येणार आहे. तसेच नागरिकांना कोरोना व्हायरसबाबत कोणतीही समस्या असल्यास ते या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. नुकतीच नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे नागरिकांशी कोरोनाबाबत चर्चा केली होती.

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसन थैमान घातले असतानाही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्याचे काम करत आहे. या सर्वांचा प्रत्येकांनी सन्मान करायला हवा आहे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचे आयोजन केले होते. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरातील गॅलरीमधून टाळ्या आणि थाळ्या वाजवून आपल्यासाठी काम करत असलेल्या डॉक्टर आणि पोलीस यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यास सांगितले होते. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चुकीची माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी त्यांनी एका व्हॉट्सऍप क्रमांकाची घोषणा केली होती. यापुढे नागरिकांना कोणतीही समस्या निर्माण झाल्यास 9013151515 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. हे देखील वाचा- केरळमध्ये Coronavirus रुग्णावर Anti-HIV औषधे वापरून यशस्वी उपचार; रुग्णाची कोरना विषाणू चाचणी निगेटिव्ह

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यातच केंद्र सरकारसह राज्य सरकारही महत्वाची पाऊले उचलताना दिसत आहे. यापुढेही राज्य सरकार अत्यावश्यक वेळेत योग्य निर्णय घेतली आणि देशावर वावरत असलेल्या संकटावर मात करतील, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी दर्शवला आहे. सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशात कोरोना बाधीत रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना व्हायरस हे देशावर वावरत असलेले मोठे संकट आहे. यात नागरिकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन केले पाहिजे, असे नरेंद्र मोदी जनतेला म्हणाले. याशिवाय नागरिकांना सोशल डिस्टिंगचे महत्वही पटवून दिले आहे.