Lockdown: कोरोना संकट काळात गौतम गंभीर याने मांडले मानवतेचे उदाहरण, लॉकडाउनमध्ये घरी काम करणाऱ्या महिलेवर केले अंत्यसंस्कार

अशा स्थितीत भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने मानवतेचे उदाहरण मांडले. लॉकडाउनमुळे गंभीरच्या सहायिकाचा मृतदेह ओडिशाला तिच्या घरी पाठवला जाऊ शकला नाही.

गौतम गंभीर (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामुळे भारतात लॉकडाउन आहे आणि व्यक्ती जिथे आहेत त्यांना त्याच ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य आणि भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मानवतेचे उदाहरण मांडले. लॉकडाउनमुळे गंभीरच्या सहायिकाचा मृतदेह ओडिशाला तिच्या घरी पाठवला जाऊ शकला नाही. ही महिला गंभीरच्या घरी मागील 6 वर्षांपासून काम करत होती. आणि गंभीरने या महिलेवर अंत्यसंस्कार करीत माणुसकी जपली. भाजपचे लोकसभेचे खासदार गंभीर यांनी ट्विटरवर आपल्या घरात काम करणार्‍या सरस्वती पात्रा यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने ट्विट केले की, 'माझ्या मुलांची देखभाल करणारी डोमेस्टिक हेल्पर असूच शकत नाही. ती कुटुंबातील एक सदस्य होती. तिच्यावर अंत्यसंस्कार करणे माझे कर्तव्य होते." (Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढला; देशात 23,077 रुग्ण, 718 जणांचा मृत्यू)

गंभीरने पुढे लिहिले की, "जात, धर्म किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार न करता नेहमीच प्रत्येकाचा सन्मान ठेवा. माझ्यासाठी एक चांगला समाज तयार करण्याचा हा मार्ग आहे.मला वाटते हा भारत आहे. ओम शांती.’’ माध्यमांच्या वृत्तानुसार, ओडिशाचा 49 वर्षीय पात्रा जाजपूर जिल्ह्यातील होता. ओडिशाची रहिवाशी सरस्वती शुगर आणि रक्तदाबाशी झुंजत देत होती. आणि काही दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांचा 21 एप्रिलला मृत्यू झाला.

केंद्रीय पेट्रोलियम व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गंभीरचे कौतुक केले. ओडिशा येथील रहिवासी प्रधान म्हणाले की, गंभीरचे उदात्त कार्य रोजगारासाठी घराबाहेर पडणाऱ्या लाखो गरीबांच्या मनात मानवतेची श्रद्धा आणखी मजबूत करेल. दुसरीकडे, गंभीर कोरोनाविरुद्ध लढाईत पुढे आहे. त्याने कोरोना योद्ध्यांना नमन करीत 30 दिवसात आम्ही दररोज सुमारे 10 हजार लोकांमध्ये रेशन किट आणि अन्नाचे वाटप केले. याशिवाय तब्बल 15 हजार मास्क, 4 हजार 200 पीपीई किट आणि शेल्टर होममध्ये 2 हजार बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सांगितले आहे.