देशात 21 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू; 46 वर्षीय महिला रुग्णाने अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
आतापर्यंत भारतात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 46 वर्षीय रुग्णावर अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गुजरातमध्ये कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत भारतात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Ahmedabad) आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 46 वर्षीय रुग्णावर अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गुजरातमध्ये कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 150 हून अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. या सहा कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी चार जण हे मुंबईतील होते. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 6 मृत्यु; मुबंई मधील 4 रुग्णांचा समावेश: BMC)
कोरोनामुळे राज्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असला तरी अनेक रुग्णांनी या आजारावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत सुमारे 50 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजाराला घाबरून जाण्याची गरज नसून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, असंही राजेशे टोपे यांनी सांगितलं आहे. लॉकडाऊन दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.