प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसेसचे स्वरूप सुधारणार; परिवहन मंत्री Nitin Gadkari यांनी दिली नवीन मानकांना मंजुरी
ही मानकं मूळ उपकरणे उत्पादक (OEMs) आणि बस बॉडी कंपन्यांनाही लागू होतील.
New Bus Body Construction In Bharat: प्रवासी बसेस रस्ता सुरक्षा निकषांवर (Road Safety Criteria) पूर्णपणे बसण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भारत-NCAP अंतर्गत नवीन मानकांना मान्यता दिली आहे. गडकरी यांनी शुक्रवारी ट्विटरवर पोस्ट केले की बस बॉडीच्या निर्मितीसाठी आता नवीन मानके असतील. ही मानकं मूळ उपकरणे उत्पादक (OEMs) आणि बस बॉडी कंपन्यांनाही लागू होतील.
बसचा दर्जा सुधारणार -
गडकरींच्या मते, बस अपघातांची वाढती संख्या पाहता हे एक मोठे पाऊल आहे, जे रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने खूप प्रभावी ठरेल. बस निर्मितीच्या नवीन मानकांचा अवलंब केल्याने देशातील बसचा दर्जाही सुधारेल, असे गडकरींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा - Threat to kill PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची, मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेसह, 500 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी)
गडकरी यांनी सांगितलं की, नवीन मानकांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत म्हणजे अपघाताच्या वेळी प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आहे. नवीन मानकांसाठी मानक अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. यावर लोकांच्या सूचना मागविण्यात येणार आहेत. लोकांच्या सुरक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे जास्तीत जास्त लक्ष देता यावे यासाठी सर्व पक्ष या उपक्रमाला पाठिंबा देतील अशी आशा गडकरींनी व्यक्त केली.
देशातील बसेसच्या दर्जावर गडकरी यांनी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केले आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बसेसचा दर्जा सुधारण्याचे त्यांनी बस उत्पादक आणि OEMs यांना सातत्याने आवाहन केले आहे. देशाच्या वाहन उद्योगात ओईएमला प्रचंड संधी आहेत, पण त्यांची कामगिरी फारच खराब आहे, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.