कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी गौतम गंभीर यांचा मदतीचा हात; खासदार निधीतून दिल्लीतील सरकारी रुग्णालयास देणार 50 लाख रुपयांचा निधी
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 450 च्या वर पोहचली आहे. अशात भाजप खासदार गौतम गंभीर कोरोनाग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत. गौतम गंभीर यांनी दिल्लीतील सरकारी रुग्णालयाला 50 लाख रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
सध्या देशावर कोरोनाचं (Coronavirus) मोठ संकट उद्धभवलं आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 450 च्या वर पोहचली आहे. अशात भाजप खासदार गौतम गंभीर (BJP MP Gautam Gambhir) कोरोनाग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत. गौतम गंभीर यांनी दिल्लीतील सरकारी रुग्णालयाला (Delhi Govt Hospitals) 50 लाख रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
गौतम गंभीर खासदार निधीतून ही मदत करणार आहे. त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे. गौतम गंभीर नेहमीचं लोकांच्या मदतीला धावत असतात. यापूर्वीही त्यांनी सैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली होती. (हेही वाचा - बिल गेट्स यांच्या 'गेट्स फाउंडेशन'कडून जगभरातील कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 कोटी डॉलर ची आर्थिक मदत जाहीर)
सध्या देशात कोरोनामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय ठरला आहे. अशा प्रकारे रुग्णांची संख्या वाढल्यास सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणं शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या सरकारकडून वैद्यकिय सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशात काही दिग्गजांकडून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला जात आहे.
जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 'गेट्स फाउंडेशन'कडून तब्बल 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय बिल गेट्स यांच्याकडून वॉशिंग्टनच्या मदतीसाठी 50 लाख डॉलर देण्यात येणार आहेत. कोरोना रोखण्यासाठी बिल गेट्स यांची ही आर्थिक मदत महत्त्वाची ठरणार आहे.