Bihar Shocker: वसतिगृहात निष्काजीपणा! अर्धवट शिजवलेला भात खाल्ल्याने 30 विद्यार्थीनी आजारी, बिहारमधील घटना
बिहारमधील आरा शहरातील आंबेडकर वसतिगृहातील 30 विद्यार्थिनी आजारी पडल्याची धक्कादायक समोर आली आहे.
Bihar Shocker: बिहारमधील (Bihar) आरा शहरातील आंबेडकर वसतिगृहातील 30 विद्यार्थिनी आजारी पडल्याची धक्कादायक समोर आली आहे. या घटनेनंतर वसतिगृहात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री जेवणात मुलींना अर्धवट शिजवलेला भात दिल्याने आजारी पडल्या आहे अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना दिली. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यांनी हा खुलासा झाला आहे. पीडित मुलीची रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (हेही वाचा- मोमोजच्या चटणीवरून वाद, ग्राहकावर चाकूने जीवघेणा हल्ला, दिल्लीतील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जेवणात विद्यार्थिंना अर्धवट शिजवलेला भात खायला दिला. दरम्यान मुलीना अर्धवट शिजवलेल्या भात खाल्यामुळे उलट्या आणि पोट दुखायला लागले. त्यानंतर विद्यार्थींनी तक्रार करायला सुरुवात केली. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे 30 विद्यार्थींनीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 12 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, उर्वरित 18 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. विद्यार्थिंनी तक्रारीत म्हटले की, अनेक दिवसांपासून वसतिगृहात
अनेक दिवसांपासून अधिकारी पोषण आहार देत नसल्याचा दावा पीडितांनी केला आहे. जेवण बनवण्याची जबाबदारी असलेल्या महिलाही काही वेळा अर्धवट शिजवलेले अन्न देतात, असे त्यांनी भोजपूरचे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्यासमोर केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेवण बनवणाऱ्या महिलांनी अर्धवट शिजवलेले अन्न देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.