Delhi Crime: मोमोजच्या चटणीवरून वाद, ग्राहकावर चाकूने जीवघेणा हल्ला, दिल्लीतील घटना

दिल्लीतीस फरश बाजारात दुकानदाराने ग्राहकावर चाकून भोसकून हल्ला केल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

Delhi Crime: मोमोजच्या चटणीवरून वाद, ग्राहकावर चाकूने जीवघेणा हल्ला, दिल्लीतील घटना
Momos (Pic Credit - Pixabay)

Delhi Crime: दिल्लीतीस फरश बाजारात दुकानदाराने ग्राहकावर चाकून भोसकून हल्ला केल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मोमोजची चटणी मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भीकम सिंग कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस आले आणि त्यांनी चौकशी सुरू केली आहे. (हेही वाचा- पॉर्न द्वारे घेतला बदला, प्रेयसीचे अश्लिल व्हिडिओ, छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल;)

मिळालेल्या माहितीनुसार, गजबजलेल्या परिसरात एका मोमोज विकणाऱ्या व्यक्तीने ग्राहकाला चटणीवर चाकून भोकसले आहे, संध्याकाळी  ग्राहक मोमोज खाण्यासाठी दुकानाजवळ आला. सुरुवातीला मोमोज घेतले त्यानंतर मोमोजची चटणी मागितल्यावर दुकानदाराने नकार दिला.  मोमोज कॉर्नर मालक आणि ग्राहक यांच्यात मोमोजच्या चटणीवरून  वाद झाला, जमावासमोरच जोरदार भांडण सुरु केले. त्यानंतर रागाच्या भरात दुकान मालकाने ग्राहकावर दुकानातील चाकूने हल्ला केला. या हल्ले दरम्यान लोकांनी गोंधळ उडवला.

ग्राहकाला या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली असून त्याला GTV रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरु केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पोलिसांनी गुन्ह्याचा घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2024 09:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).