Rajasthan: राजस्थानमध्ये भेसळीविरोधात सरकारची मोठी कारवाई! नामांकित कंपन्यांचा मसाल्यांचा साठा जप्त

राज्याच्या केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानुसार काही नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त आढळून आले.

spices (PC - Pixabay)

Rajasthan: राजस्थान (Rajasthan) मध्ये अन्न भेसळीविरुद्धच्या मोहिमेत देशातील अनेक नामवंत मसाल्यांच्या कंपन्यांची उत्पादने 'असुरक्षित' आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि हे मसाले त्वरित जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापी, वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शुभ्रा सिंह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मोहिमेअंतर्गत राज्यातील नामांकित कंपन्यांसह विविध कंपन्यांकडून मसाल्यांचे एकूण 93 नमुने घेण्यात आले आहेत. राज्याच्या केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानुसार काही नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण जास्त आढळून आले.

सिंग यांनी सांगितलं की, राज्यातील सर्व अधिकारी आणि मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून असुरक्षित आढळणारे मसाले जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, 'MDH' मसाल्यांचे उत्पादन युनिट हरियाणात असल्याने आणि 'एव्हरेस्ट' आणि 'गजानंद' मसाल्यांचे उत्पादन युनिट गुजरातमध्ये असल्याने कारवाईसाठी तेथील अन्न सुरक्षा आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा -MDH Denies Allegation: पुराव्यांअभावी आरोप निराधार; मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडच्या समावेशाचा आरोप एमडीएचने फेटाळला)

या नामांकित कंपन्यांचे मसाले असुरक्षित -

याशिवाय, या प्रकरणांमध्ये कारवाईसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्लीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पत्र लिहिले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त इक्बाल खान यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान एमडीएच, एव्हरेस्ट, गजानंद, श्याम, शीबा ताज या नामांकित कंपन्यांचे मसाले 'असुरक्षित' आढळले आहेत. (वाचा - US Rejected MDH Exports: अमेरिकेने ऑक्टोबर 2023 पासून नाकारल्या एमडीएचने निर्यात केलेल्या 31 टक्के शिपमेंट्स; समोर आले 'हे' कारण)

तपासणीत 'एमडीएच' कंपनीच्या गरम मसाल्यात 'ॲसिटामीप्रिड', 'थायमेथोक्सम', 'इमिडाक्लोप्रीड', 'ट्रायसायकल', भाजी मसाल्यात 'प्रोफेनोफॉस' आणि चना मसाल्यात, श्याम कंपनीच्या गरम मसाल्यात 'ॲसिटामीप्रिड' आढळून आले. मसाला, शीबा फ्रेश कंपनीच्या रायता मसाल्यात 'थियामेथोक्सम' आणि 'ॲसिटामिप्रिड', गजानंद कंपनीच्या पिकल मसाल्यात 'इथिओन' आणि एव्हरेस्ट कंपनीच्या जिरे मसाल्यात 'ॲझोक्सीस्ट्रोबिन' आणि 'थायमेथोक्सम पेस्टिसाइड/कीटकनाशक' आढळून आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif