Swati Maliwal Assault Case: अरविंद केजरीवाल यांचे पीएस विभव कुमार यांना कोर्टाकडून मोठा झटका; जामीन अर्ज फेटाळला
आता बिभव कुमार तीस हजारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. आम आदमी पार्टी (AAP) च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी अलीकडेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता.
Swati Maliwal Assault Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे माजी पीएस विभव कुमार (Bibhav Kumar) यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने विभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता विभव कुमार तीस हजारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. आम आदमी पार्टी (AAP) च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी अलीकडेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणी विभव सध्या पोलिस कोठडीत आहे. अशा स्थितीत बिभवच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
गेल्या सुनावणीत तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारच्या जामीन अर्जावर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती. विभवच्या जामीन अर्जावर दिल्ली पोलिसांना सोमवारी म्हणजेच आजच उत्तर दाखल करायचे होते. (हेही वाचा -'You Tuber ध्रुव राठीच्या व्हिडिओमुळे लोक स्वाती मालीवाल करत आहेत ट्रोल,' AAP खासदाराचा आरोप)
स्वाती मालीवाल यांना कोर्टात अश्रू अनावर -
आज कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वाती मालीवाल कोर्ट रूममध्ये हजर होत्या. यावेळी, जेव्हा स्वाती मालीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्याचा व्हिडिओ कोर्टात न्यायाधीशांना दाखवला जात होता. तसेच विभवचे वकील न्यायाधीशांना एफआयआरबद्दल सांगत होते तेव्हा स्वाती मालीवाल यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर त्या मूकपणे कामकाज ऐकू लागल्या.
विभव कुमार यांच्यावरील आरोप आणि अटकेनंतर स्वाती मालीवाल यांच्यावर आम आदमी पक्षाकडून विविध आरोप करण्यात येत होते. दरम्यान, स्वाती मालीवाल राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. स्वाती मालिवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी आम आदमी पार्टी अभिषेक मनू सिंघवी यांना राज्यसभेवर पाठवू शकते, अशीही चर्चा होती. अलीकडेच एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्वाती मालीवाल म्हणाल्या की, मला खासदार राहण्याची इच्छा नाही. (हेही वाचा - Swati Maliwal Assault Case: विभव कुमार मुख्यमंत्री निवासस्थानातून ताब्यात; स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ल्याचा आरोप)
माझ्याशी प्रेमाने बोलले असते तर मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा दिला असता. मला कोणत्याही पदाचे बंधन वाटत नाही. मला असे वाटते की मी खूप काम केले आहे आणि मी पद नसतानाही काम करू शकते. त्यांनी मला ज्या पद्धतीने मारहाण केली, आता जगातील कोणतीही शक्ती कितीही शक्तिशाली असली तरी मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही, असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं आहे.