Assam Rape Case: अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीचा तलावात बुडून मृत्यू (Watch Video)

अमास गँगरेपमधील मुख्य आरोपी तफजुल इस्लामचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोलीस आरोपी तफजुलला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जात होते. त्याचवेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने तलावात उडी मारली, मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला.

Photo Credit- X

Assam Rape Case: आसाममधील नागाव जिल्ह्यातील धिंगमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape)झाला होता. पीडित मुलगी गुरुवारी संध्याकाळी शिकवणी करून सायकलवरून घरी परतत होती. दरम्यान, मोटारसायकलवरून आलेल्या तीन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेला बेशुद्धावस्थेत तलावाजवळ रस्त्याच्या कडेला सोडून आरोपी पळून गेला. या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. यानंतर या घटनेचा तपास करून पोलिसांनी मुख्य आरोपी तफजुल इस्लाम याला अटक केली. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू (Assam Rape Case Accused Die)झाला आहे. (हेही वाचा:Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशात 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, धमकी देत पालकांकडून मागितली खंडणी )

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली. आरोपी तफजुल इस्लाम याला पहाटे चारच्या सुमारास घटनास्थळी नेण्यात आले. यादरम्यान आरोपींनी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत तलावात उडी मारली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, मात्र सुमारे दोन तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह सापडला. (हेही वाचा:Beed Minor Girl Rape Case: अल्पवयीन आरोपींकडून आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, बीड येथील धक्कादायक घटना )

आरोपीचा तलावात बुडून मृत्यू

आसामच्या धिंग येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये संताप पहायला मिळत आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आरोपीवर कडक कारवाईचे आश्वासन दिले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement