Asaram Bapu Hospitalised: आसाराम बापूंची प्रकृती खालावली; छातीत वेदना होऊ लागल्याने जोधपूरमधील AIIMS मध्ये दाखल

छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आसाराम बापू यांना गुरुवारी रात्री पुन्हा एम्समध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

Asaram Bapu (PC - ANI)

Asaram Bapu Hospitalised: बलात्कार प्रकरणात (Rape Case) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू (Asaram Bapu) यांना छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर जोधपूर (Jodhpur) च्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. सोमवारी आसाराम बापू यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना तुरुंग अधिकाऱ्यांनी जेलच्या दवाखान्यात नेले, जिथे त्याची इलेक्ट्रोकार्डिओग्राम चाचणी करण्यात आली.

तथापी, गुरुवारी त्यांना नियमित तपासणीसाठी एम्समध्ये नेण्यात आले, तेथे त्यांना अशक्तपणा असल्याचे आढळून आले. मात्र, त्याच्या इतर चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आले आहेत. तपासणीनंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. (हेही वाचा -Asaram Bapu life imprisonment: असाराम बापू याला जन्मठेप, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण)

दरम्यान, छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आसाराम बापू यांना गुरुवारी रात्री पुन्हा एम्समध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यापूर्वी आसाराम यांनी राजस्थान उच्च न्यायालयाकडे जोधपूरमधील खासगी रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी मागितली होती, ज्याला मंजूरी देण्यात आली होती. (हेही वाचा -(हेही वाचा, Asaram Bapu Convicts in Rape Case: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी)

आसाराम बापू सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात एका बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना महिन्यातून एक किंवा दोनदा एम्स जोधपूरमध्ये आणले जाते. 2013 मध्ये त्यांच्यावर एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली होती.