क्रिकेटपटूंनी भरलेल्या विमानाचे इंजिन झाले फेल; कानपूरहून इंदूरला जात होती फ्लाइट

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे खेळाडूही होते.

Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

कानपूर (Kanpur) च्या धावपट्टीवर इंडिगो विमानाचे (IndiGo Chartered Flight) इंजिन फेल झाले. उड्डाण करण्यापूर्वी ही घटना घडली. धावपट्टीवर पोहोचल्यानंतर विमानाचे इंजिन निकामी झाले. यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे खेळाडूही होते.

सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे असल्याचे सांगण्यात येत आहे. लिजेंड क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ या विमानाने इंदूरला जात होते. चकेरी विमानतळावरून दुपारी तीनच्या सुमारास चार्टर्ड क्लासचे विमान उड्डाण घेणार होते, असे सांगण्यात येत आहे. धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानातील बिघाडाची माहिती मिळाली. त्याचे इंजिन काम करत नव्हते. (हेही वाचा - PM Narendra Modi's Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार 2 ग्रॅम सोन्याची अंगठी)

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चकेरी विमानतळावर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. माहितीनुसार, कानपूर विमानतळावर अजूनही क्रिकेट संघ उपस्थित आहेत. त्यांना दुसऱ्या विमानाने इंदूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे.