उत्तर प्रदेश: 18 वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून काढल्या 300 ग्रॅम वजनाच्या लोखंडी वस्तू
उन्नावमधील एका 18 वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून 300 ग्रॅम वजनाच्या लोखंडी वस्तू काढल्या आहेत. या मुलाच्या पोटातून डॉक्टर्संनी लोखंडी खिळे, 4 इंची लांबीची सळी अशा एकूण 36 वस्तू काढल्या. चार डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून या मुलाच्या पोटातून या सर्व लोखंडी वस्तू काढल्या.
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao) अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उन्नावमधील एका 18 वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून 300 ग्रॅम वजनाच्या लोखंडी वस्तू काढल्या आहेत. या मुलाच्या पोटातून डॉक्टर्संनी लोखंडी खिळे, 4 इंची लांबीची सळी अशा एकूण 36 वस्तू काढल्या. चार डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून या मुलाच्या पोटातून या सर्व लोखंडी वस्तू काढल्या.
सदार कोतवाली परिसरातील भटवण गावात राहणाऱ्या करणला गेल्या दोन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. करणची आई कमलाने सांगितले की, तिने उन्नाव आणि कानपूरमधील अनेक डॉक्टरांकडे करणला दाखवले. परंतु, करणचा पोटदुखीचा त्रास सुरूचं होता. त्यानंतर करणच्या आईने त्यालाा शुक्लगंजच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. (हेही वाचा - बिहारमधील मुजफ्फरपुर येथे 20 वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या; आरोपीने साखळीने बांधलेला मृतदेह एअरबॅगमध्ये भरून फेकला पाण्यात)
यासंदर्भात डॉ. संतोष वर्मा यांनी सांगितले की, करण नावाच्या युवकाला पोट दुखीचा त्रास होत होता. करणच्या सीटी स्कॅन आणि एक्स-रेमध्ये पोटातील लोखंडी वस्तू दिसून आल्या. ऑपरेशन चालू असताना करणच्या पोटातून लहान आणि मोठ्या अशा सुमारे 36 वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यात खिळे, लोखंडी सळ्यांचा अशा सुमारे 300 ग्रॅम वजनाच्या 36 वस्तूंचा समावेश होता. (हेही वाचा - बलात्काराच्या घटनांमध्ये भारतातील 'हे' 10 राज्य आहेत अतिशय घातक; राजस्थानमध्ये सर्वाधिक भयानक परिस्थिती, तर महाराष्ट्रात 55 टक्क्यांनी वाढलेत बलात्कार प्रकरणं)
डॉक्टर वर्मा यांनी या शस्त्रक्रियेविषयी बोलताना सांगितले की, या पेशंटचं ऑपरेशन करणं खूप कठीण होतं. यासाठी बराच कालावधी लागला. परंतु, तज्ञ सर्जन डॉ. पवन सिंह, डॉ. आशिष पुरी, डॉ. राधा रमण अवस्थी आणि स्वत: डॉ वर्मा यांनी अत्यंत सावधगिरीने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. यातील काही लोखंडी वस्तू हृदयाच्या अगदी जवळ होत्या. सुमारे अडीच तास चाललेल्या या ऑपरेशनच्या यशानंतर डॉक्टरांनी सुटकेचा श्वास घेतला. ऑपरेशननंतर आपला मुलगा ठीक असल्याचे आई कमला यांनी सांगितले आहे. मात्र, करणच्या पोटात या वस्तू कशा गेल्या याबाबत त्यांना काहीही कल्पना नाही.