Agnipath Recruitment Scheme 2022: भारतीय वायुसेनेत अग्नीवीरांच्या रजिस्ट्रेशन साठी आजपासून सुरूवात; indianairforce.nic.in वर करा अर्ज

यानंतर एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल आणि त्याद्वारा अग्नीवीरांची पुढील निवड प्रक्रिया सुरू होणार आहे.

Agnipath | Twitter/DD Sahyadri

Agniveer Registration for Air Force:   सैन्यदलात भरती प्रक्रियेमध्ये बदल करत अग्निपथ (Agnipath Recruitment Scheme) ही नवी योजना आणण्यात आली आहे. देशात त्याचे काही हिंसक पडसाद उमटले असले तरीही ही योजना लागू करण्यावर सरकार ठाम आहे. आज या अग्निपथ योजना अंतर्गत वायुसेनेमध्ये (Air Force)  भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.आज 24 जून पासून त्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. 5 जुलै पर्यंत इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात. यानंतर एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल आणि त्याद्वारा अग्नीवीरांची पुढील निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी indianairforce.nic.in/, careerindianairforce.cdac.in या वेबसाईट्सवर अर्ज करता येणार आहे.

भारतीय वायुसेनेतअग्निपथ द्वारा अर्ज करणार्‍यांची परीक्षा 24 जुलै ते 31 जुलै दरम्यान होणार आहे. त्यानंतर 21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान फिजिकल टेस्ट होईल. 29 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर मेडिकल एक्झामिनेशन होईल. जो उमेदवार या सार्‍या टेस्ट मधून बाहेर पडेल त्यांची यादी 1 डिसेंबर 2022 दिवशी जाहीर केली जाईल आणि 30 डिसेंबर पासून त्यांची ट्रेनिंग सुरू होणार आहे. नक्की वाचा: Agnipath Yojana: केंद सरकार कडून देशातील तरूणांसाठी लष्करभरतीची नवी प्रक्रिया जाहीर; पहा काय आहेत वैशिष्ट्यं!

वायुसेनेमधील 'अग्नीवीरां'च्या भरतीविषयी महत्त्वाच्या तारखा  आणि तपशील

ऑनलाईन रजिस्ट्रेशन - 24 जून ते 5 जुलै 2022

ऑनलाईन परीक्षा - 24 जुलै नंतर

कुठे कराल अर्ज - indianairforce.nic.in/, careerindianairforce.cdac.in

दरम्यान अर्ज करणार्‍या उमेदवारासाठी आयुमर्यादेचं बंधन आहे. त्याची जन्मतारीख 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 मधील असणं गरजेचे आहे.

इथे पहा सविस्तर नोटिफिकेशन

भारतीय वायुसेना कडून दिलेल्या माहितीनुसार, अग्नीवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच भत्ता दिला जाणार आहे. अग्नीवीरांना 30 दिवसांची वर्षाला सुट्टी मिळणार आहे. प्रत्येकाचा 48 लाखांचा विमा असेल. जर दलात काम करत असताना वीरगती प्राप्त झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 1 करोडची मदत मिळेल. चार वर्षांसाठी होणार्‍या त्यांच्या निवृत्तीनंतर अनेक सरकारी सेवांमध्ये आरक्षण असणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif