Madhya Pradesh Crime: दोघांवर गोळी झाडून आरोपीने संपवले स्वत:चं आयुष्य, खांडवा येथील धक्कादायक घटना
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भरदिवसा एका तरुणाने दोघांवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे.
Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भरदिवसा एका तरुणाने दोघांवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील खांडवा परिसरातील रस्त्यावर घडली. आरोपीने स्वामिनारायण मंदिरापासून अरिहंत कॉलेजमध्ये लोकांना बंदूकीचा धाक दाखवला. एकाने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीचा मृतदेह ताब्यात घेतला. (हेही वाचा- अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, आरोपी पोलिसाचा मुलगा )
मिळालेल्या माहितीनुसार, खंडवा येथील स्वामीनारायण मंदिराजवळ येऊन आरोपीने पिस्तूल काढून दोन तरुणांवर गोळ्या झाडल्या. हत्या केल्यानंतर जवळच असलेल्या अरिहंत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने कॉलेजच्या आवारात स्वत:वर गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दोन तरुणींवर गोळी का झाडली आणि आरोपीने आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे.
#WATCH | #Indore: Man Shoots Two People At Swaminarayan Temple, Then Takes His Life; Police Reach Spot #MPNews #MadhyaPradesh pic.twitter.com/bCTdvUA8T9
— Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) April 4, 2024
कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तो पाणी पिण्याच्या बहाणे गेला होता आणि तेथे त्याने स्वत:वर गोळी झाडली. भावकून पोलिस ठाण्या अंतर्गत ही घटना नोंदवण्यात आली आहे. या घटनेनंतर इदौरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस या घटनेची तपासणी करत आहे. आरोपीने असं कृत्य का केले याचा तपास पोलिस घेत आहे. आरोपीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2024 03:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

