Kanda Express Train: 1,600 टन कांदा भरलेली विशेष 'कांदा एक्स्प्रेस ट्रेन' नाशिकहून दिल्लीला पोहोचली; दिल्लीकरांना आता 35 रुपये किलो मिळणार कांदा

नाशिकहून रेल्वेच्या 42 डब्यांमध्ये कांदा भरून तो दिल्लीला पोहोच करण्यात आला आहे.

Kanda Express Train (फोटो सौजन्य - X/@jagograhakjago)

Kanda Express Train: सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने महाराष्ट्रातून कांद्याची मोठी खेप दिल्लीला पाठवली आहे. विशेष 'कांदा एक्स्प्रेस ट्रेन' (Kanda Express Train) महाराष्ट्रातून कांदा (Onion) घेऊन दिल्लीत पोहोचली आहे. यानंतर हा कांदा दिल्लीतील एनसीसीएफ, नाफेड आणि मोबाईल व्हॅनद्वारे सर्वसामान्यांना 35 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून दिला जाईल.

दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 75 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा खरेदी करणं अवघड होत आहे. तथापी, सणासुदीच्या काळात कांद्याचे दर आणखी वाढू नयेत यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. दिवाळीपूर्वी कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने भारतीय रेल्वेच्या मदतीने दिल्लीच्या घाऊक बाजारात 1,600 टन कांदा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Onion Price Hike: निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा)

दरम्यान, कांद्याची ही खेप दिल्लीला पोहोचल्यानंतर दिल्ली आणि आसपासच्या बाजारपेठांमध्ये दररोज 2,500 ते 2,600 टन कांद्याचा पुरवठा केला जाईल. नाशिकहून रेल्वेच्या 42 डब्यांमध्ये कांदा भरून तो दिल्लीला पोहोच करण्यात आला आहे. अलीकडेच ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी दिल्लीप्रमाणेच देशातील इतर राज्यांमध्येही ही व्यवस्था केली जाईल, असे सांगितले होते. (हेही वाचा - Onion Export Curbs: केंद्राने कांदा निर्यातबंदी हटवली, शुल्कातही कपात; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय)

'कांदा एक्स्प्रेस ट्रेन' नाशिकहून दिल्लीला पोहोचली - 

आसाम, नागालँड आणि मणिपूरसह लखनौ, वाराणसी आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये विस्तार करण्यावर आमचे लक्ष आहे. सप्टेंबर महिन्यापासून कांदा, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सणासुदीच्या काळात दर आणखी वाढू नयेत, यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे, असंही खरे यांनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif