MP Girl Molested By IceCream Seller: आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाहांगीराबाद येथील घटना (Watch video)

मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीम विक्रेत्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आले आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली.

MP Girl Molested By IceCream Seller: आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाहांगीराबाद येथील घटना (Watch video)
Girl molest PC Tw

MP Girl Molested By IceCream Seller: मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीम विक्रेत्याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचं समोर आले आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. दोन आठवड्यांपूर्वी ही घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- ईशान्येकडील महिलेचा पुणे येथे ओला कॅब चालकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळीस आईस्क्रीमच्या दुकानात आलेल्या ११ वर्षीय मुलीची दुकानदाराने छेड काढली. तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. विशेष म्हणजे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी हे कृत्य पाहिले परंतु कोणीही त्यांच्यामध्ये मद्यस्थी करण्यात आले नाही. मोहम्मद खालिद खान असं आरोपीचे नावा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

जहांगीराबाद येथील एका व्यक्तीने रात्रीच्या वेळीस बाल्कनीतून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, खालिद मुलीच्या अंगाला अयोग्यपध्दतीने स्पर्श करताना दिसत आहे. मुलगी आईस्क्रीमच्या कार्टवर उभी राहून आईस्क्रीम निवडत होती. त्यावेळीस आरोपीने तीला जवळ खेचले. ती या पकटीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

त्यानंतर त्या व्यक्तीने मुलीला आईस्क्री देऊन काही वेळाने निघून जाऊ दिले. या घटनेनंतर पीडित मुलीने तिच्या आईला तक्रार केली. आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आई आणि मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. रमेश साहू नावाच्या एका व्यक्तीने ही घटना फोनमध्ये कैद केली. पोलिसांनी या घटनेनंतर आरोपीला काल्पी येथून पकडले.

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 09:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).