A Minor Girl Raped In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात अल्पवयनी मुलीवर बलात्कार, पोलीसांनी 9 जणांना केले अटक, घटनेमुळे परिसर हादरला
उत्तर प्रदेशातील घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा अपहरण केले आणि पुढे तीच्यावर लैंगिक अत्याचार केले.
A Minor Girl Raped In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी आरोपी व्यक्ती आणि मुस्लिम धर्मगुरू (मौलाना) यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की, अल्पवयीन मुलीचे लग्न आरोपी साहिल नावाच्या मुलासोबत यापूर्वी ठरले होते, परंतु काही कारणास्तव लग्न रद्द करण्यात आले. लग्नाला नकार दिल्यामुळे साहिल हा संतापला. 7 जुलै शुक्रवारी तीला घरातून पळवल्याचे उघडकीस आले.
चिडलेल्या साहिलने नातेवाईकांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.पीडित मुलीच्या कुटूंबाना समजल्यावर त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पाच जणांविरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीसांच्या मदतीने मुलीला शोधण्यास यश आले. पीडीत मुलीशी चौकशी दरम्यान तीच्यावर लैंगिक छळ झाल्याचे सांगितले. पोलीसांनी या प्रकरणात आरोपींविरुध्दा बाल लैंगिक शोषण संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत कलम गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी सर्व आरोपींना ताबडतोब अटक केले आहे.आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. बांदा जिल्ह्यातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इंडिया टुडे या वृत्त संस्थेने या घटनेची माहिती प्रसारित केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2023 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

