दिल्ली: जामिया विद्यापीठात अज्ञाताकडून गोळीबार, एक विद्यार्थी जखमी; पहा व्हिडिओ

या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तसेच पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जामिया विद्यापीठात अज्ञाताकडून गोळीबार (PC - ANI)

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (CAA) दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात (Jamia Millia Islamia University) होणाऱ्या आंदोलनादरम्यान एका अज्ञात तरुणाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तसेच पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व आणि एनआरसी (NRC) मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका अज्ञात तरुणाने गोळीबार करण्यास सुरुवात केली.

या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापाठीत सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलने होत आहेत. आज विद्यार्थ्यांकडून जामिया विद्यापाठ ते राजघाट मार्गादरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अज्ञात तरुणाने गोळीबार केल्याने एक विद्यार्थी जखमी झाला असून पोलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतलं आहे. (हेही वाचा - पंतप्रधान आणि नाथूराम गोडसे यांची विचारधारा एकसारखीच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वादग्रस्त विधान)

गोळीबात करण्यात आलेल्या तरुणाने भारत माता की जय, दिल्ली पोलिस जिंदाबाद, वंदे मातरम् या घोषणा दिल्या. या व्हिडिओमध्ये हा तरुण बंदूक घेऊन जात असल्याचे दिसत आहे. मात्र, तरीदेखील पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर काही वेळात पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.