बसपच्या नेत्याच्या मुलाचे हॉटेलमध्ये पराक्रम, प्रेमी युगुलकाला दाखवला बंदुकीचा धाक
दिल्लीच्या हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बीएसपीच्या एका नेत्याच्या मुलाने हॉटेलमधील प्रेमी युगुलकाला बंदुकीचा धाक देत धमकावत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला आहे.
दिल्लीच्या हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसपच्या एका नेत्याच्या मुलाने हॉटेलमधील प्रेमी युगलुकाला बंदुकीचा धाक देत धमकावत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला आहे. या घटनेमुळे हॉटेलच्या आवारात भीतीचे वातारवरण तयार झाले होते. तर या घटेनीतील आरोपीने हयात या हॉटेलमधून लखनऊ येथे पळ काढला आहे.
आशीष पांडे असे या तरुणाचे नाव असून तो बसपा नेते राकेश पांडे यांचा मुलगा आहे. दिल्लीच्या हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यास आलेल्या आशीष पांडे याचे एका प्रेमी युगुलकासोबत काही कारणावरुन भांडण झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या आशीषने त्याच्याजवळील बंदुक काढून त्यांना धकावण्यास सुरुवात केली. तर आशीष सोबत असलेल्या काही तरुणींनीसुद्धा या प्रेमी युगुलकाला शिव्या देण्यास सुरुवात केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घडलेल्या घटनेनंतर हॉटेलच्या व्यवस्थापकांनी आशीष विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
परंतु या दोघांनमधील वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेतील आरोपी आशीष पांडे याने हॉटेलमधून लखनऊला पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर पोलीस स्थानकात आशीष विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार या घटनेची चौकशी करण्यासाठी काही पोलीस दिल्लीला रवाना झाले आहेत.