Uttar Pradesh Accident: ट्रक आणि ट्रेलर यांच्यात जोरदार धडक, वाहनांना लागलेल्या आगीत चालकांसह तिघांचा होरपळून मृत्यू

ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेनंतर (Accident) दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीत दोन्ही वाहनांचा चालकांसह तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

कानपुर-हमीरपुर (Kanpur-Hamirpur) महामार्गावर रविवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेनंतर (Accident) दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीत दोन्ही वाहनांचा चालकांसह तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कानपुरचे पोलीस अधिक्षक अष्टभुजा पी. सिंहने याबाबत माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

महेश उर्फ रुद्रपाल (वय, 45), अंकित पाल (वय, 25), कांची कुशवाहा अशी मृतांची नावे आहेत. महेश आणि अंकीत हे दोघेजण फतेहपुर येथील रहिवाशी होते. तर, कांची हे मध्य प्रदेशच्या छतरपुर येथे वास्तव्यास होते. हे देखील वाचा- ‘एक्स्प्रेस वे’ वरील वाहनांची वेग मर्यादा 140 किलोमीटर प्रतितास करण्याचा नितीन गडकरी यांचा विचार

सिंह यांनी सांगितले की, जवाने भरलेला ट्रक कानपूर-हमीरपूर महामार्गावर असलेल्या साजेती पोलीस स्टेशन परिसरातील अमौली गावाजवळ पोहोचला होता, तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रेलरने त्याला धडक दिली. दोन्ही ट्रकमध्ये एकूण चार लोक होते, त्यापैकी एका वाहनाचा मदतनीस थोडक्यात बचावला. त्याची ओळख छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी अरविंद अशी झाली आहे.त्याने सांगितले की, वाहनांच्या धडकेमुळे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.पोलिस पुढील कारवाई करत आहे.