चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हैदराबादमध्ये फ्लायओव्हरवरुन कोसळली कार; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हैदराबादमधील रायदुर्गम परिसरात असलेल्या फ्लायओव्हरवर शनिवारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून काही 6 जण जखमी झाले आहेत.

Car Accident (PC - ANI Tweet)

देशात रस्ते अपघाताचे (Road Accident) प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हैदराबादमधील (Hyderabad) रायदुर्गम परिसरात असलेल्या फ्लायओव्हरवर शनिवारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून काही 6 जण जखमी झाले आहेत. या अपघातात बायोडायव्हर्सीटी जंक्शनजवळ (Biodiversity Junction) असलेल्या एका फ्लायओव्हरवर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट फ्लायओव्हरवरचे रेलिंग तोडून खाली कोसळली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - पुणे: दिवे घाटात वारकर्‍यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेव यांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांंच्यासह एकाचा मृत्यू; 15 जखमी)

एएनआय ट्विट - 

कार फ्लायओव्हरवरून खाली कोसळल्यानंतर लोकांनी याठिकाणी गर्दी केली. तसेच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये लाल रंगाची कार बायोडायव्हर्सीटी फ्लायओव्हरवरून वेगात जाताना दिसत आहे. परंतु, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार फ्लायओव्हरवरून खाली कोसळली. उड्डाणपुलाखाली आपल्या मुलाची वाट पाहत असलेल्या महिलेच्या अंगावर कार कोसळल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्यात यावे, अशी सूचनाही सरकारकडून देण्यात आली आहे.