Ratan Tata Cake For Christmas Celebrations: तामिळनाडूमधील बेकरीने ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी बनवला रतन टाटा आणि त्यांच्या कुत्र्याचा 7 फूट उंच केक

बेकरीने ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन (New Year Celebrations) चा एक भाग म्हणून हा केक तयार केला आहे. केकचा आकार आणि डिझाईन दोन्ही खास असून ते बेकरीचे वैशिष्ट्य बनले आहे.

7-foot tall cake of Ratan Tata and his dog (फोटो सौजन्य - IANS)

Ratan Tata Cake For Christmas Celebrations: तामिळनाडूतील (Tamil Nadu) रामनाथपुरम (Ramanathapuram) येथील एका बेकरीने नुकताच एक अनोखा केक तयार केला आहे. ज्यामध्ये रतन टाटा (Ratan Tata) आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याची (Pet Dog) आकृती आहे. हा केक अंदाजे 7 फूट उंच आहे. बेकरीने ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन (New Year Celebrations) चा एक भाग म्हणून हा केक तयार केला आहे. केकचा आकार आणि डिझाईन दोन्ही खास असून ते बेकरीचे वैशिष्ट्य बनले आहे. रतन टाटा यांची लोकप्रियता आणि त्यांच्या कुत्र्याबद्दलचे प्रेम दर्शवणारा हा केक त्यांच्याबद्दल आदराचे प्रतीक आहे.

ख्रिसमससाठी बनवला 7 फूट उंचीचा केक -

दरवर्षी ऐश्वर्या नावाची बेकरी प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आकारात केक बनवते. या बेकरीने आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट नाव कमावले आहे. यावर्षी त्यांनी त्यांच्या केकची थीम म्हणून दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची निवड केली आहे. हा केक 60 किलो साखर आणि 250 अंडी घालून बनवण्यात आला. हा केक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोक विशेषत: विद्यार्थी केकसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. (हेही वाचा -Ratan Tata यांना होता 'हा' गंभीर आजार; हळूहळू सर्व अवयव झाले निकामी, काय आहेत या आजाराची लक्षणे? जाणून घ्या)

बेकरी मालकावर रतन टाटांचा प्रभाव -

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी खास आणि अनोखे बनवायचे असल्याचे बेकरी मालकाने सांगितले. रतन टाटा यांचा वारसा आणि त्यांच्या कुत्र्याशी असलेले नाते यामुळे त्यांना हा केक तयार करण्याची प्रेरणा मिळाली. मालकाने असेही सांगितले की रतन टाटा हे केवळ प्रतिष्ठित उद्योगपतीच नाहीत तर त्यांची माणुसकी आणि प्राण्यांवरील प्रेमाने त्यांना खूप प्रभावित केले. म्हणून त्यांनी हा केक तयार केला. (हेही वाचा - Ratan Tata यांचा 'Goa' देखील त्यांच्या पश्चात मृत्यूमुखी पडल्याचा वायरल WhatsApp Message खोटा; मुंबई पोलिस Sudhir Kudalkar यांनी केला खुलासा)

रतन टाटा आणि त्यांच्या कुत्र्याचा 7 फूट उंच केक - 

यापूर्वी बनवण्यात आला होता 250 किलोचा केक -

बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर आयोजित 50 व्या वार्षिक केक शोमध्ये उद्योगपती रतन टाटा आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा यांच्या सन्मानार्थ केक बनवण्यात आला होता. रतन टाटा यांना समर्पित केलेला 250 किलोचा केक इन्स्टिट्यूट ऑफ बेकिंग अँड केक आर्टने बनवला होता. केक बनवण्यासाठी 10 दिवस लागले होते. केक कलाकार शंतनू, महेश आणि राहुल यांनी हा केक तयार केला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now