7th Pay Commission: NDMA मध्ये या पदांसाठी होणार भरती! दरमहा 2 लाख रूपये पगार मिळणार

नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने (National Disaster Management Authority) दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत प्रोजेक्ट मॅनेजर(Project Manager), अकाऊंट असिस्टंट (Accounts Assistant) या पदासाठी 2 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

Money| File Image | (Photo Credits: PTI)

सरकारी नोकरी मधून पगाराची आणि नोकरीची मिळणारी शाश्वती यामुळे अनेक तरूणांचा ओढा अजूनही सरकारी नोकरी मिळवण्याकडे असतो. सरकारी नोकरीसाठी आता काही जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने (National Disaster Management Authority) दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत प्रोजेक्ट मॅनेजर(Project Manager), अकाऊंट असिस्टंट (Accounts Assistant) या पदासाठी 2 जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या नव्या भरती केल्या जाणार्‍या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. मग जाणून घ्या या पदांसाठी कधी, कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे? 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत वेतनात वाढ होण्याची शक्यता.

प्रोजेक्ट मॅनेजर -

प्रोजेक्ट मॅनेजर हे पद ग्रुप A, गॅझेट - अंडर सेक्रेटरी पद आहे. सातव्या वेतन आयोगानुसार या पदावर रूजू होणार्‍या व्यक्तीला वेतनश्रेणी 15,600 to Rs 39,100 + ग्रेड पे of Rs 6,600 (प्री रिवाईज्ड) इतकी असेल.

अकाऊंट असिस्टंट -

अकाऊंट असिस्टंट हे सेक्शन ऑफिसरचं पद आहे. हे ग्रुप B गॅझेट पद असून सातव्या वेतन आयोगानुसार या पदावर रूजू होणार्‍या व्यक्तीला वेतनश्रेणी 9300 ते 34 800 + ग्रेड पे 4800 (प्री रीवाईज्ड) इतकी असेल.

वयो मर्यादा -

वरील पदांसाठि अर्ज करणारी व्यक्ती किमान 18 वर्षाची असणं आवश्यक आहे. तर कमाल वय 56 वर्ष असावं. जातीनिहाय आरक्षणानुसार संबंधित उमेदवाराला वयाची मुभा मिळू शकते.

निवड प्रक्रिया -

संबंधित उमेदवाराला लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत या निवड प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे.

कसा कराल अर्ज?

संबंधित विभागाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्हाला सारी माहिती मिळू शकते. अर्ज करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज करता येईल. पात्र उमेदवारांची मुलाखत नॅशनल सायक्लॉन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, NDMA भवन, A1, सफदरजंग एन्क्लेव नवी दिल्ली - 110029 या कार्यालयात मुलाखत घेण्यात येईल.

सरकारी नोकरी मध्ये कामासोबत मिळणारे भत्ते, त्यामध्ये नियमित होणारी वाढ यामुळे तरूणांचा ओढा सरकारी नोकरीकडे अधिक असतो. मग तुम्हीदेखील या पदांसाठी उत्सुक असाल तर नक्की अर्ज करा.