7th Pay Commission: 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सेवानिवृत्तीच्या वयात होणार वाढ
चंद्रशेखर राव यांनी सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याचा आणि सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
7th Pay Commission: तेलंगणा (Telangana) चे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (CM K. Chandrasekhar Rao) यांनी राज्य सरकारी कर्मचार्यांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याचा आणि सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा (Salary Hike) निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत आता सर्व सरकारी कर्मचार्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय राव यांनी सरकारी कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age) वाढविण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे 9.37 लाख कर्मचार्यांना वेतनवाढ लागू होईल. यासह मुख्यमंत्री के. आर. चंद्रशेखर राव यांनी कर्मचार्यांच्या संघटनेशी चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलंगानाच्या सीएमओद्वारे देण्यात आलेल्या मातीनुसार, पगार वाढीचा फायदा कायमस्वरुपी सरकारी कर्मचारी, अनुदानित कर्मचारी, कामगारांची संख्या, दैनंदिन पगार, पूर्णवेळ प्रासंगिक, करार, आउटसोर्सिंग, सोसायटी, होमगार्ड्स, अंगणवाडी सेविकासह इतर काही कर्मचार्यांनादेखील मिळेल. (हेही वाचा -7th Pay Commission: नव्या वर्षात 'या' सरकारी कर्मचा-यांना पगार आणि डीए मध्ये मिळणार घसघशीत वाढ)
दरम्यान, पगारवाढीशिवाय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे की, सरकारी कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे, पदोन्नती, बदली, सेवा नियमांचे सरलीकरण व अनुकंपा या प्रकरणात सरकार लवकरचं मोठा दिलास देणार आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनीही कर्मचारी संघटनेशी चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे कायदेशीर अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे.