जम्मू-काश्मीर: भारतीय जवानांकडून 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. मात्र, भारतीय जवानांनी याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील मेंधार सेक्टरमध्ये ही चकमक झाली. याबाबात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सीमारेषेवर पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. मात्र, भारतीय जवानांनी याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना (Pakistani Terrorists) कंठस्नान घातलं आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील मेंधार सेक्टरमध्ये (Mendhar Sector) ही चकमक झाली. याबाबात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
मेंधार सेक्टरमध्ये 9 फेब्रुवारी रोजी भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत 3 जणांना कंठस्नान घातलं. मेंधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघनही करण्यात आलं होतं. (हेही वाचा - छत्तीसगढः नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या CoBRA बटालियनचे 2 जवान शहीद; 4 जखमी)
दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात 2 स्थानिक नागरिकांसह सीआरपीएफचे 2 जवान गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये वारंवार शस्त्रसंधीच उल्लंघन केलं जात आहे. भारतीय जवान दहशतवाद्यांच्या या कारवाई उधळून लावत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)