CBSE Student Dies by Suicide: बारावीच्या परिक्षेत दोन विषयात नापास झाल्याने 16 वर्षीय मुलाची आत्महत्या, चौकशी सुरु
परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील एका मुलाने दोन विषयांत नापास झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
CBSE Student Dies by Suicide: नुकताच CBSE (Central Board Of Secondary Education) वर्ग 12 च्या परिक्षेचा निकाल (Result) जाहीर झाला होता. परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 16 वर्षाच्या मुलाने दोन विषयांत नापास झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोळसला आहे. मुलाने पेईंग गेस्ट हाऊसमध्ये पंख्याला लटकून आत्महत्या केली. अर्जून सक्सेना असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. (हेही वाचा- पतीच्या शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जून सस्केना गेल्या काही वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होता. सोमवारी १२वीचा निकाल जाहीर झाला होता. तो दोन विषयाच अनुर्त्तीण झाल्याने निराश होता. नैराश्यातून त्यांने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली. घरी कुणी नसताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अर्जून हा उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी होता. अभियांत्रिकीच्या प्रवेश परिक्षासाठी परिक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीत राहत होता.
खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे पोलिसांना दरवाजा तोडावा लागला. पोलिसांनी लटकलेला मृतदेहाला ताब्यात घेतला त्यानंतर या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबाला देण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, अर्जून नापास झाला होता त्यामुळे निराश झाला आणि नैराश्यात त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, आत्महत्याचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील कारवाई करत आहोत. घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही.