INDvsENG: अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने आता शाहबाज नदीम आणि राहुल चहर यांना मुख्य टीममधून काढून, स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठवले आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत आढळले 3,297 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 20 लाख 52 हजार 905 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 51,415 वर पोहोचला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस लसिकरण संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) कायदा लागू केला जाईल, असे शाह यांनी म्हटले आहे. काही लोक सीएए कायद्याविरोधात दिशाभूल करुन गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. परंतू, त्याचा सीएए कायद्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे शाह यांनी म्हटले. पश्चिम बंगालमील मादुआ समूदायासह सीएए अंतर्गत शरणार्थी आलेल्या भारतीयांना नागरिकाता देण्याची प्रक्रिया सीएए कायद्यांतर्गत सुरु होईल, असे शाह म्हणाले.
जगभरातील विविध देशांमध्ये 2,072 भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या सौदी अरेबियामध्ये 906 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये 375 भारतीयांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्यानंतर ओडिशा, तेलंगणा आणि उर्वरित निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळणार आहे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या सोशल मीडिया मेळाव्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीत ग्रामसभा सुरु करण्यास संमती. पण, कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने दक्षता म्हणून तात्पुरती स्थगिती. आता कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभा घेण्यास संमती असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
रेल्वे प्रवासी प्रवासादरम्यान ई केटरींगद्वारे ताजे जेवण मागवता येणार असल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे. हे जेवणाचे शुल्क तिकीटात समाविष्ट असणार नाही. कोरोना व्हायरस संकटानंतर तयार जेवण ग्राहकांच्या मागणीप्रमाणेच देण्यात आले होते. परंतू, कालांतरानंतर लक्षात आले की, या जेवणाचे शुल्क तिकीटात समाविष्ट नव्हते असेही आयआरसीटीसीने म्हटले आहे.
राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनासमोरील मुघल गार्डन नागरिक, पर्यटकांसाठी खुले होणार आहे. 13 फेब्रुवारी ते 21 मार्च या काळात 1000 ते 1700 तासांसाठी हे गार्डन खुले असेल. या गार्डनमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन परवानगी बंधनकारक असणार आहे, असे राष्ट्रपती सचिवालयाने म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमानास परवानगी नाकारल्याचे राज्य सरकारने राजभवनास कळविले होते. त्यामुळे राजभवनावरील अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करायला हवे होते, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार चर्चा हल्ला चढवला. केंद्र सरकारला अन्यायकारी कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील असे राहुल गांधी म्हणाले.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही.
वैयक्तिक कार्यक्रमासाठी शासकीय विमानाचा वापर करणे योग्य नाही. राज्यपालांना हे विमान वापरण्यची परवानगी नव्हती. ज्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांना याबाबत माहिती दिली नाही, त्याची चौकशी करण्यात यावी, असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. ट्विट-
एकीकडे कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. तर, दुसरीकडे महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यात लसीकरणाची तयारी सुरु असताना गेल्या 24 तासात 3 हजार 451 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7 टक्के झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिलाचा भरणा न करणारे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 14 लाख ग्राहक आहेत. या सर्वाचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दूरचित्र संवादाद्वारे आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र सरकारने बुधवारी जाहीर केले की, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय (SEBC) मधील मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस आरक्षणामधून राज्य ऊर्जा विभागात नोकरीसाठी अर्ज करू शकतात. सध्या नव्याने तयार झालेल्या एसईबीसी कोट्यात मराठ्यांच्या आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, ज्याने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समुदायाला आरक्षण देणार्या 2018 च्या कायद्यावर स्थगिती दिली आहे. आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणामधून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने महावितरणला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)