Mallikarjun Kharge Summoned: मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला; बजरंग दलावर चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी संगरूर कोर्टाने पाठवले समन्स
हिंदू सुरक्षा परिषद बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात संगरूर न्यायालयात 100 कोटी रुपयांची मानहानीची याचिका दाखल केली आहे.
Mallikarjun Kharge Summoned: बजरंग दलावर वक्तव्य केल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) अडचणीत सापडले आहेत. बजरंग दलाच्या मानहानीच्या प्रकरणात खर्गे यांना समन्स बजावण्यात आले आहे. संगरूर जिल्हा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांनी 100 कोटी रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणात खर्गे यांना समन्स बजावले आहे.
हिंदू सुरक्षा परिषद बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात संगरूर न्यायालयात 100 कोटी रुपयांची मानहानीची याचिका दाखल केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बजरंग दलाची देशविरोधी संघटनांशी तुलना करून बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (हेही वाचा - BJP In Karnataka Election: दक्षिण भारत 'भाजपमुक्त', कर्नाटकमध्ये नऊ जिल्ह्यांत 'कमळा'चा सुफडा साफ)
बजरंग दलाच्या बदनामीचा खटला -
हितेश भारद्वाज यांनी पुढे बोलताना सांगितलं की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास समाजात द्वेष पसरवण्याचे काम करणाऱ्या बजरंग दल किंवा अन्य देशविरोधी संघटनांवर बंदी घालण्यात येईल, असे खर्गे यांनी एका सभेत सांगितले होते. याच्या निषेधार्थ हितेश भारद्वाज यांनी संगरूर न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
या प्रकरणावर, वरिष्ठ विभाग न्यायाधीश रमनदीप कौर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना समन्स जारी केले आणि त्यांना 10 जुलै 2023 रोजी संगरूर न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.