Uttar Pradesh: भररस्त्यात दोन मुलींना तरुणांकडून मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

भररस्त्यात दोन मुलींना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला पोलिसांनी अॅक्शन मोड घेतले आहे. कानपूर पोलिसांनी शनिवारी दोन तरुणांना अटक केले.

Viral video Photo Credit X

Uttar Pradesh: भररस्त्यात दोन मुलींना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला पोलिसांनी अॅक्शन मोड घेतले आहे. कानपूर पोलिसांनी शनिवारी दोन तरुणांना अटक केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा-  दिल्लीत 5 वर्षाच्या मुलीवर 14 वर्षांच्या मुलाचा बलात्कार; गुन्हा दाखल, तपास सुरु)

मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातून घरी परतणाऱ्या दोन महाविद्यालयीन मुलींचा विनयभंग केला आणि मारहाण केली. तर दुसऱ्या आरोपीने घटनेचे रेकॉर्डिंग केले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना सुमारे १० दिवसांपूर्वी घडली होती. संचेडी पोलिस स्टेसन परिसरात पीडित मुली कॉलेज संपवून घरी जात असताना मिश्री मठाजवळ आरोपींनी त्यांना अडवले.

कानपूर येथील व्हायरल व्हिडिओ

मुलींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिल्यानंतर एका आरोपीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या आरोपींनी त्याच्या फोनवर मारहाणीचा व्हिडिओ शूट केला. या घटनेचा व्हिडिओ आरोपीने तिसऱ्या व्यक्तीला शेअर केला. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ पीडितेच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आले.

घटनेची माहिती समजल्यानंतर पीडित कुटुंबियांनी शुक्रवारी सचेंडी पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरुध्द तक्रार दाखल केली. तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी मुलींवर अत्याचार करणाऱ्या अमितला आणि घटनाचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आफ्रिदीला अटक केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement