Vamika Kohli Photos: वामिका हुबेहुब विराट कोहलीसारखी दिसते, अनुष्का शर्मासोबतचे वामिकाचे गोंडस फोटो व्हायरल
तर अनुष्का शर्मा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये छोट्या स्लिंग बॅगमध्ये दिसली. वामिकाने आपला पहिला वाढदिवस टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेतच साजरा केल्याची माहिती आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात केपटाऊन येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम सामना खेळवला जात आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) चिअर करण्यासाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुलगी वामिकासह (Vamika) मैदानावर पोहोचली, ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅमेरामनने मॅचदरम्यान विराट कोहलीच्या छोट्या देवदूताचा फोटो क्लिक केला. गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये विराट कोहलीची छोटी परी खूपच गोंडस दिसत आहे. तर अनुष्का शर्मा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये छोट्या स्लिंग बॅगमध्ये दिसली. वामिकाने आपला पहिला वाढदिवस टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिकेतच साजरा केल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे वामिकाचा जन्म झाल्यापासून विराट आणि अनुष्काने तिचा चेहरा जाहीरपणे उघड केला नाही. त्यांनी माध्यमांना पत्र पाठवून त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत आता वामिकाचे फोटो समोर आल्यावर लोकांनी तिचा स्क्रीनशॉट काढून व्हायरल केला. यामुळे या जोडप्याचे चाहते संतप्त झाले असून ब्रॉडकास्टरवर आपला राग व्यक्त करत आहेत. (हे ही वाचा Chakda Xpress: अनुष्का शर्मा 3 वर्षानंतर करणार बाॅलिवुड मध्ये कमबैक, महिला किक्रेटेर झुलन गोस्वामीच्या दिसणार भुमिकेत)
गेल्या वर्षी 11 जानेवारी रोजी वामिकाचा जन्म झाला होता. त्यामुळे नुकतीच वामिका एक वर्षाची झाली आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलीच्या गोपनीयतेची खूप काळजी घेतात. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काने फोटो शेअर न केल्याबद्दल मीडिया आणि फोटोग्राफर्सचे आभार मानले होते. 'Chakda Express' हा अनुष्काचा आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.