Urfi Javed हिने प्रियांका चोप्रा हिच्या लूकची केली कॉपी, भडकलेल्या फॅन्सने दिल्या 'अशा' प्रतिक्रिया
कारण तिच्या फॅशन्स सेन्समुळे ती नेहमीच आता पापाराजीच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसून येते.
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अधिकच चर्चेत आहे. कारण तिच्या फॅशन्स सेन्समुळे ती नेहमीच आता पापाराजीच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसून येते. अशातच आता उर्फी हिने अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिच्या लूकची कॉपी केल्याचे काही फोटो सोशल मीडियात पोस्ट केले आहेत. मात्र तिचा हा लूक चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे तिच्यावर आता टीका करण्यास सुरुवात केली आहे.
उर्फी हिला नुकतेच मुंबईत स्पॉट करण्यात आले. त्यावेळी ती एका फोटोशूटमध्ये व्यस्त होती. पण अखेर ती पापाराजीच्या कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावेळचा तिचा लूक पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पण एका युजरने तिला मुस्लिम समाजाचा अपमान करत असल्याचे ही म्हटले आहे.(Katrina Kaif Mehendi Ceremony Photos: कटरिना कैफ च्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो आले समोर; पहा या जोडप्याने केलेली धमाल)
दरम्यान, यापूर्वी सुद्धा उर्फी जावेद हिने हॉलिवूड अभिनेत्रींच्या लूक्सची कॉपी केली होती. यामध्ये किम कर्दाशिया ते केंडल जेन्नरच्या लूकचा समावेश आहे. उर्फीचे प्रत्येक लूक समोर आल्यानंतर ते ऐवढे व्हायरल होतात की काहीजण तिला ट्रोल करणे सोडत नाहीत.