Year Ender 2020: यंदाच्या वर्षात 'या' टीव्ही स्टार्सच्या मृत्युमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्री हादरली, नाव ऐकून अंत:करण जड होईल
कारण दिग्गज बॉलिवूड कलाकार ते टेलिव्हिजन अभिनेत्री यांचे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निधन झाल्याने सर्वांच्या पायाच्या खालची जमीनच सरकली गेली.
Year Ender 2020: 2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर महासंकट ओढावले गेले. या महासंकटाच्या काळात लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीसाठी हे वर्ष तर अतिशय वाईट गेले. कारण दिग्गज बॉलिवूड कलाकार ते टेलिव्हिजन अभिनेत्री यांचे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निधन झाल्याने सर्वांच्या पायाच्या खालची जमीनच सरकली गेली. कोणावर योग्य निदान न झाल्याने निधन तर कोणी तणावात असल्याचा कारणामुळे आत्महत्या केली. तर जाणून घेऊयात अशा कलाकारांबद्दल ज्यांनी 2020 मध्ये आपला जीव गमावला आहे. या कलाकांराची आठवण जरी काढली असता अंत:करण जड होते. (2021 ला कोणाची नजर लागू नये म्हणून Amitabh Bachchan यांचा खास उपाय; लिंबू-मिरची बांधून काढली दृष्ट See Photo)
-दिव्या भटनागर
7 डिसेंबरला टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागर हिच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. रिपोर्ट नुसार, कोरोना झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र दिव्या हिचा अखेर मृत्यू झाला. दिव्याच्या पतीबद्दल देवोलिना हिने काही खुलासे ही केले.
-आशीष रॉय
ससुराल सिमर का मध्ये झळकलेला अभिनेता आशीष रॉय यांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला. किडनीच्या समस्येने ग्रासले असता त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे अभिनेत्याने मदतीसाठी सोशल मीडियात आवाहन ही केले. मात्र यामधून काहीच साध्य झाले नाही.
-समीर शर्मा
टिव्ही इंडस्ट्री मधील प्रसिद्ध कलाकार समीर शर्मा यांचा मृतदेह ज्यावेळी 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरात मिळाल्याने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. पोलिसांनी आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले. पण परिवाराने त्याची हत्या झाल्याचे म्हटले.(Year Ender 2020: अभिषेक बच्चन, बॉबी देओल, सुष्मिता सेनसह या बॉलिवूड कलाकारांनी वेब सीरिजमध्ये केला डेब्यू, पाहा संपूर्ण यादी)
-जगेश मुक्ति
टेलिव्हिजन अभिनेता जगेश मुक्ति यांचे सुद्धा यंदाच्या वर्षात निधन झाले. 10 जूनला त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली गेली. अमिता का अमित, श्री गणेश, हंसी तो फंसी आणि मन सारख्या टिव्ही शो मधून ते झळकले होते.
-प्रेक्षा मेहता
टिव्ही वरील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यात आत्महत्या केली. रिपोर्टनुसार, काम न मिळाल्याचा तणावामुळे तिने सुसाइड केली असल्याचे सांगण्यात आले.
तर यंदाचे कोरोनाचे वर्ष हे संपूर्ण जगाला हादरवणारे ठरले आहे. त्यामुळे आता कोरोनावरील लस कधी येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.